मुंबई : माजी आमदार झिशान सिद्दीकी यांंच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेर दोन संशयित तरूण आढळले. निर्मल नगर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. मात्र त्यांच्याकडे काही संशयासस्पद आढळले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

माजी आमदार झिशान सिद्दीकी यांचे वांद्रे (पूर्व) येथे कार्यालय आहे. गुरूवारी दुपारी १२.३० च्या सुमारास दोन तरूण झिशान सिद्दीकी यांना भेटण्यासाठी वांद्रे येथील कार्यालयात आले होते. मात्र त्यांची भेट होऊ शकणार नाही, असे त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र तरीही ते दोघे कार्यालयाबाहेर घुटमळत होते. संध्याकाळपर्यंत ते कार्यालयाच्या आसपास फिरत होते. याबाबत कर्मचाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी निर्मल नगर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. हे दोघे ग्रामीण भागातून आले होते. त्यांचा मसाल्याचा छोटा व्यवसाय होता. त्यात आर्थिक नुकसन झाल्याने ते मदती मागण्यासाठी आले होते. त्यांच्या चौकशीत काही संशयास्पद आढळले नाही, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी हत्या करण्यात आली होती. त्याचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे येथील कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीने हा हल्ला घडवून आणला होता. सिद्दीकी यांच्या कुटुंबियांना देखील धमक्या आल्या होत्या. त्यानंतर झिशान सिद्दीकी हे गुन्हेगारी टोळ्यांच्या रडावर आहेत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.