मुंबई : रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव विशेष आणि हडपसर ते हिसार विशेष रेल्वेगाडीच्या सेवा कालावधीत वाढ करण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांना विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेता येईल.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गाडी क्रमांक ०११०४/०११०३ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष रेल्वेगाडीची घोषणा करण्यात आली. ही गाडी ५ मेपर्यंत चालवण्यात येणार होती. त्यानंतर गाडी क्रमांक ०११०३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर सोमवारी २६ मेपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. आता ९ जूनपर्यंत ही रेल्वेगाडी चालविण्याची सूचना देण्यात आली असून त्यामुळे प्रवाशांना या रेल्वेगाडीच्या दोन फेऱ्यांचा लाभ घेता येईल. गाडी क्रमांक ०११०४ मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर रविवारी २५ जूनपर्यंत पर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली होती. आता त्यात वाढ करून ८ जूनपर्यंत ही रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. या रेल्वेगाडीला करमाळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक ०४७२६ हडपसर ते हिसार साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर सोमवारी २६ मेपर्यंत चालविण्यात आली. परंतु, या रेल्वेगाडीला प्रवाशांची मागणी असल्याने, तसेच गर्दी विभाजित करण्यासाठी ही रेल्वेगाडी ३० जूनपर्यंत चालविण्याची सूचना देण्यात आली आहे. या रेल्वेगाडीच्या पाच जादा फेऱ्या धावतील. गाडी क्रमांक ०४७२५ हिसार ते हडपसर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी दर रविवारी २५ मेपर्यंत चालविण्यात आली. त्यानंतर आता या रेल्वेगाडीचा कालावधी २९ जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना अधिकच्या फेऱ्यांचा लाभ घेता येईल. या रेल्वेगाडीला पुणे, चिंचवड, लोणावळा, कल्याण, वसई रोड, वापी, उधना, भरूच, वडोदरा, गोधरा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपुर, दुर्गापुर, जयपुर, रिंगास, सीकर, नवलगढ़, झुन्झुनू, चिड़ावा, लोहारू आणि सादुलपुर येथे थांबे असतील. या रेल्वेगाडीच्या वेळेत, संरचनेत आणि थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. या रेल्वेगाड्यांचे विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आरक्षण उपलब्ध आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाद्वारे देण्यात आली.