मुंबई : मालाडच्या अप्पापाडा परिसरात सोमवारी संध्याकाळी लागलेली आग रात्री ११ वाजता पूर्ण विझली. या आगीत तब्बल तीन हजार झोपड्या जळून खाक झाल्या. या सर्व कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले आहेत.

मालाडच्या अप्पापाडा परिसरात सोमवारी संध्याकाळी लागलेल्या आगीने काही क्षणातच अक्राळविक्राळ रूप धारण केले. तब्बल १० हजार चौरस मीटर परिसरात ही आग पसरली होती. रात्री ८ वाजता आग नियंत्रणात आली. मात्र रात्री ११ वाजता आग पूर्ण विझवण्यात यश आले. या दुर्घटनेत संपूर्ण जळालेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला होता. त्याची अद्याप ओळख पटलेली नाही. मात्र हा मृतदेह एका ४५ वर्षीय पुरुषाचा असावा, असे अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – “सामाजिक क्षेत्रात कवडीचीही किंमत…”, सुभाष देसाईंच्या मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशाला भाजपामधून विरोध; थेट मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र!

हेही वाचा – वैभव नाईकांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी; शिंदे गटात प्रवेश करणार? मुख्यमंत्री म्हणाले, “ते रोज मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महानगरपालिकेने या दुर्घटनेतील विस्थापितांची तात्पुरती निवाऱ्याची आणि जेवणाची सोय केली आहे. बुवा साळवी मैदान, चैतन्य हॉल आणि मालाड प्रसुतिगृहाच्या समोरील जागेत रात्री त्यांची सोय करण्यात आली होती. दरम्यान, या दुर्घटनेमुळे वन जमिनीच्या जागेवर वाढत्या झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.