Maharashtra CM Office Receives Threat : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सॲपवर मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे. धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. धमकीच्या मेसेज प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तसेच धमकीचा हा मेसेज का पाकिस्तानी नंबरवरून आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मिळाल्यानंतर मुंबई पोलीस अलर्ट झाले आहेत. धमकीचा मेसेज करणाऱ्याचं नाव मालिक शहाबाज हुमायून राजा देव असं सांगितलं जात आहे. या धमकीच्या मेसेजनंतर गुप्तचर यंत्रणा देखील अलर्ट झाल्या आहेत. मुंबई पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. धमकीचा मेसेज पाठवणारी व्यक्ती ही व्यक्ती नेमकं कुठली आहे? भारतातील आहे की भारताच्या बाहेरील आहे? याचाही तपास आता पोलीस करत आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, या धमकीच्या मेसेजनंतर मुख्यमंत्री कार्यालय आणि मुंबईतील इतर संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर महत्वाची पावलं उचलण्यात येण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नंबरवरून पोलिसांना हा धमकीचा मेसेज मिळाल्यामुळे यामागे काही कट आहे का? याचाही शोध पोलिसांकडून घेतला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकनाथ शिंदेंनाही मिळाली होती धमकी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शासकीय वाहन बॉम्बने उडवून दिले जाईल, अशी धमकी काही दिवसांपूर्वी मिळाली होती. याबाबतची माहिती देखील मुंबई येथील काही पोलीस ठाणे आणि मंत्रालयाला ‘ईमेल’द्वारे प्राप्त झाली होती. यानंतर लगेच मुंबई पोलीस, दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) सतर्क होऊन ‘अॅक्शन मोड’वर आले होते. या धमकीच्या प्रकरणात ‘ई-मेल आयडी अॅड्रेस’वरून एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर या धमकीचा मुंबई पोलिसांनी तपास केला असता हा फसवा ईमेल असल्याची माहिती सांगण्यात आली होती.