मुंबई : कोकणात जाणाऱ्यांची आणि कोकणातून मुंबईकडे येणाऱ्यांची संख्या वाढल्याने, रेल्वेगाडीला दोन डबे वाढविण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यास मदत होईल. हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला द्वितीय आणि तृतीय वातानुकूलित डब्याचे तात्पुरता प्रत्येकी एक डबा वाढविला जाणार आहे. पुढील एका महिन्यासाठी ही सुविधा प्रवाशांसाठी उपलब्ध केली आहे.

हेही वाचा : बाणगंगाच्या पायऱ्यांचे नुकसान करणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करा, पालिका आयुक्तांच्या सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक २२४७५ हिसार-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेस ३ ते ३१ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक २२४७६ क्रमांकाची कोईम्बतूर – हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस ६ जुलैपासून ते ३ ऑगस्टपर्यंत एक द्वितीय श्रेणीचा वातानुकूलित डबा आणि एक तृतीय श्रेणीचा वातानुकूलित डबा जोडला जाईल. यामुळे या रेल्वेगाडीला एकूण २२ डबे जोडले जातील. दोन डबे वाढवल्याने, प्रवाशांचा गर्दीचा भार विभाजित केला जाईल, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.