मुंबई : पोलाद पुरवठा करण्याच्या निमित्ताने आगाऊ रक्कम घेऊन सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कोलकात्यातील कंपनीच्या दोन मालकांविरोधात टिळक नगर पोलीस ठाण्यात शनिवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. डोंबिवली येथे वास्तव्याला असलेले तक्रारदार दिलीप मधुकर दलाल (४०) गेल्या १० वर्षांपासून घाटकोपरमधील फोर्टन स्टील प्रा. लि. कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. ते २०२२ पासून कंपनीला लागणाऱ्या स्टीक कॉईल कोलकात्यातील एका कंपनीकडून मागवत होते. दलाल यांच्या फोर्टन कंपनीला कोलकात्यातील कंपनीचे दोन मालक आवश्यक असलेला कच्चामाल पुरवत होते. तक्रारदारांच्या कंपनीला आरोपींच्या कंपनीने २०२४ मध्ये तीन वेळा पोदाल पुरवठा केला. त्याबाबतच्या करपावत्याही दिल्या. त्यामुळे दलाल यांच्या कंपनीचा कोलकात्यातील कंपनीने विश्वास संपादन केला.

त्यामुळे दलाल यांच्या फोर्टन कंपनीला आवश्यक असणारे एक हजार टन पोलाद त्यांनी कोलकात्यातील कंपनीकडून मागवण्याचा निर्णय घेतला. त्यातील ५०० टन पोलाद घाटकोपर येथील तक्रारदार कंपनीला प्राप्त झाले. त्याची रक्कम कोलकात्यातील कंपनीला देण्यात आली. पण त्यानंतर कोलकत्यातील कंपनीला तीन कोटी दोन लाख रुपये आगाऊ देण्यात आले. त्याबदल्यात केवळ ७९ लाख ६७ हजार रुपयांचे पोलादच तक्रारदारांच्या कंपनीला पाठवण्यात आले. उर्वरीत दोन कोटी २२ लाख ८४ हजार रुपये किमतीचे २०० टन पोलाद अद्याप तक्रारदार कंपनीला देण्यात आलेले नाही. रक्कम स्वीकारताना आरोपी कंपनीच्या मालकाने १५ दिवसांत पोलाद पाठवण्याचे आश्वासन दिले होते. तसेच पोलाद न पाठवल्यास त्या बदल्यात दिलेली आगाऊ रक्कम दोन टक्के व्याजासह परत करण्याचे मान्य केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आठ महिने उलटून गेले तरी तक्रारदार कंपनीला पोलाद मिळाले नाही, तसेच आगाऊ रक्कमही त्यांना परत करण्यात आली नाही. अखेर फोर्टन स्टील. प्रा. लि. कंपनीने याप्रकरणी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार टिळक नगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) अंतर्गत कलमांतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकात्यातील कंपनीच्या दोन मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा करीत