मुंबई – बंदी असताना मुंबईत व्हिक्टोरिया घोडागाडी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पेटा संस्थेने दिलेल्या तक्रारीनुसार गावदेवी पोलिसांनी एका व्हिक्टोरिया घोडागाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईत व्हिक्टोरिया घोडागाडीच्या प्रवासी आणि मालवाहतूकीवर बंदी घालण्यात आली आहे. तरी देखील व्हिक्टोरिया घोडागाडीचा वापर सुरू आहे. १२ मे रोजी मलबार हिल येथे राहणाऱ्या उर्वी शाह या महिलेला गावदेवी परिसरात एक व्हिक्टोरिया घोडागाडी दिसली. सीसील जंक्शनच्या बीबा शोरूम येथून ही घोडागाडी काही इसमांना घेऊन जात होती. शाह यांनी त्याचे तात्काळ मोबाईलमध्ये चित्रण केले. हा प्रकार त्यांनी पेटा संस्थेच्या (पिपल फॉर द इथिकल ट्रिटमेंट ऑफ अनिमल) समन्वयनक सलोनी सकारिया यांना सांगितला. त्यांनी गावदेवी पोलीस ठाण्यात या व्हिक्टोरिया घोडागाडी चालक आणि मालक यांच्या विरोधात तक्रार दिली. घोड्याला जबरदस्तीने ओझे वाहून नेण्यास भाग पाडले आणि त्यांना क्रुर वागणूक दिली असे साकारिया यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी शनिवारी सकारिया यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला आणि व्हिक्टोरिया घोडागाडी चालकाविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम ११, ३ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कल २२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.