मुंबई : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील ब्लाॅकमुळे रविवारी विलेपार्ले, राममंदिर येथील लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे

मुख्य मार्ग

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ पर्यंत

परिणाम : सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० दरम्यान सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड स्थानकात पुन्हा डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील. तर, सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ दरम्यान ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला – वाशी स्थानकांदरम्यान अप व डाऊन मार्गावर

कधी : रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान

परिणाम : सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल आणि सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ या वेळेत पनवेल/बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला, पनवेल ते वाशी या विभागांदरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे ते वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी दिली जाईल.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ दरम्यान

परिणाम : ब्लाॅक कालावधीत सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालवण्यात येईल. विलेपार्ले रेल्वे स्थानकाच्या जलद थांबा फलाटाची लांबी अपुरी असल्याने विलेपार्ले येथे लोकल थांबा नसेल. तर, राम मंदिर रेल्वे स्थानकाला जलद फलाट नसल्याने येथे लोकल थांबणार नाही. हार्बर मार्गावर विलेपार्ले आणि राम मंदिरासाठी लोकल उपलब्ध असतील. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येतील. बोरिवली आणि अंधेरीहून काही लोकल हार्बर मार्गावर गोरेगावपर्यंत धावतील.