लोकसत्ता प्रतिनिधी
उद्या दिनांक २४ जून पासून २८ जून २०२५ पर्यंत असे सलग ५ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे. यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांच्या कालावधीदरम्यान १९ वेळा समुद्राला मोठी भरती असेल. यावेळी समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळणार आहेत. या पावसाळ्यातील मोठ्या भरतीचा तपशिल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर करण्यात आला आहे. त्यात भरतीचा दिनांक व वेळ यांसह भरती दरम्यान समुद्रात उसळणा-या लाटांची उंचीदेखील नमूद करण्यात आली आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात सर्वाधिक उंचीच्या लाटा २६ जून रोजी उसळणार आहेत.
मोठी भरती असण्याच्या सर्व दिवशी भरती कालावधीदरम्यान नागरिकांनी समुद्रकिना-या नजीक जावू नये, तसेच या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे वेळोवेळी देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
पाच दिवस भरतीचे
१. मंगळवार, दि. २४ जून सकाळी – ११.१५ वा. लाटांची उंची (मीटर) – ४.५९
२. बुधवार, २५ जून दुपारी – १२.०५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७१
३. गुरुवार, २६ जून दुपारी – १२.५५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७५
४. शुक्रवार, २७ जून दुपारी – ०१.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.७३
५. शनिवार, २८ जून दुपारी – ०२.२६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६४
जुलै महिन्यात
१. गुरुवार, दि. जुलै सकाळी – ११.५७ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७
२. शुक्रवार, दि. जुलै दुपारी – १२.४० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६६
३. शनिवार, दि. जुलै दुपारी – ०१.२० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६७
४. रविवार, दि. जुलै दुपारी – ०१.५६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६०
ऑगस्ट
१. रविवार, १० ऑगस्ट दुपारी – १२.४७ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५०
२. सोमवार, ११ ऑगस्ट दुपारी – ०१.१९ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५८
३. मंगळवार, १२ ऑगस्ट दुपारी – ०१.५२ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५८
४. शनिवार, २३ ऑगस्ट दुपारी – १२.१६ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५४
५. रविवार, २४ ऑगस्ट दुपारी – १२.४८ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५३
सप्टेंबर
१. सोमवार, ८ सप्टेंबर दुपारी – १२.१० वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७
२. मंगळवार, ९सप्टेंबर दुपारी – १२.४१ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.६३
३. बुधवार, १० सप्टेंबर मध्यरात्री – ०१.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९
४. बुधवार,१० सप्टेंबर दुपारी – १३.१५ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५७
५. गुरुवार, ११ सप्टेंबर मध्यरात्री – ०१.५८ वा. लाटांची उंची (मीटर्स) – ४.५९