मुंबई : पश्चिम रेल्वेवरील माहीम रेल्वे स्थानकाजवळ महिलेचे धड आणि डोके वेगळे केलेला मृतदेह आढळून आला. महिलेच्या शरीराचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करण्यात आले होते. या सर्व घटनेचा तपास मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांद्वारे केला जात आहे. प्राथमिक माहितीनुसार महिलेची हत्या केल्याचे दिसत असून या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहीम रेल्वे स्थानकाजवळ मंगळवारी सकाळी रुळांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्याला (ट्रॅकमन) रुळांच्या बाजूला संशयित गोणी दिसली. कर्मचाऱ्याने याबाबत स्थानक व्यवस्थापकांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी जाऊन गोणीची पाहणी केली असता, धड आणि डोके वेगळे केलेला महिलेचा मृतदेह दिसला. महिलेचे वय २५ ते ३० वर्षे असून तिच्या गळय़ात मंगळसूत्र असल्याने ती विवाहित असल्याचे दिसते. या संपूर्ण घटनेसंदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 25th May 2022 रोजी प्रकाशित
माहीम रेल्वे स्थानकाजवळ महिलेचा मृतदेह
महिलेच्या शरीराचे तुकडे करून एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बंद करण्यात आले होते.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-05-2022 at 00:08 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman s body found near mahim railway station zws