मुंबई : फलटण येथील महिला डाॅक्टर आत्महत्याप्रकरणी काँग्रेसकडून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी घेराव घालण्याचा इशारा युवक काँग्रेसच्याकडून देण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संपदा मुंडेप्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबाला दिले असून न्याय मागण्याठी सोमवारी दुपारी १२ वाजाता गिरगाव चौपाटी येथे आंदोलन करून त्यानंतर वर्षा बंगल्याला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली.

युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारीही सामील होणार आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टरला न्याय मिळाला पाहिजे, फडणवीस सरकारच्या काळात दलित महिला अत्याचारात झालेली वाढ झशली आहे. बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य कुटुंबातील डॉ. संपदा मुंडे यांना भाजपचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व पोलिसांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करावी लागली. ही आत्महत्या नसून हत्याच आहे.

व्यवस्थेने संपदाचा बळी घेतला आहे, पण सरकार मात्र चौकशीच्या नावाखाली संपदा मुंडेंच्या मुख्य गुन्हेगारांना वाचवत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस आंदोलन करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करणार आहे. या आंदोलनात युवक काँग्रेस सोबत, मुंबई काँग्रेस आणि मुंबई काँग्रेसच्या अंतर्गत सर्व विभागीय नेते मोठ्या संख्येने संहगाभी होणार आहेत.

सोमवारी दुपारी १२ वाजता गिरागाव चौपाटी येथून हे आंदोलन सुरु केले जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले असून खासदार वर्षा गायकवाड यांच्याकडून या आंदोलनाचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती राजहंस यांनी दिली.