News Flash

Coronavirus : सक्रिय करोनाग्रस्त तीनशेहून कमी

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील २२०, ग्रामीणचे ६१, जिल्ह्य़ाबाहेरील ६ अशा एकूण २८७ रुग्णांचा समावेश आ

२४ तासांत मृत्यू नाही, ८ रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्य़ात २४ तासांत एकाही रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला नाही. केवळ ८ नवीन रुग्णांची भर पडली. सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्य़ातील रुग्णसंख्या एकआकडी असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. नवीन  रुग्णांच्या तुलनेत करोनामुक्त अधिक असल्याने जिल्ह्य़ातील सक्रिय रुग्णसंख्या तीनशेहून खाली आली आहे.

सक्रिय रुग्णांमध्ये शहरातील २२०, ग्रामीणचे ६१, जिल्ह्य़ाबाहेरील ६ अशा एकूण २८७ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णांतील २२० रुग्णांवर गृह विलगीकरणात तर ६७ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय वा कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी नोंदणी नसलेल्या रुग्णांमुळे सक्रिय रुग्णसंख्या १०७ ते १५० दरम्यान होती. परंतु प्रशासनाने या नोंदी दुरुस्त केल्यावर  रुग्णसंख्या ३१० हून अधिकवर गेली. परंतु काही दिवसांपासून नवीन रुग्णांहून करोनामुक्त अधिक आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्ण कमी झाले. दिवसभरात जिल्ह्य़ात एकही मृत्यू नसल्याने शहरातील मृत्यूसंख्या ५,८९१, ग्रामीण २,६०३, जिल्ह्य़ाबाहेरील १,६२१ अशी एकूण १० हजार ११५ रुग्ण इतकी आहे. दिवसभरात शहरात ७, ग्रामीणला १ असे एकूण ८ नवीन करोनाग्रस्त आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या ३ लाख ३९ हजार ९१७, ग्रामीण १ लाख ४६ हजार ६२, जिल्ह्य़ाबाहेरील ६,८०० अशी एकूण ४ लाख ९२ हजार ७७९ रुग्णांवर पोहोचली.  दिवसभरात शहरात १४, ग्रामीणला ११ असे २५ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या ३ लाख ३३ हजार ८०६, ग्रामीण १ लाख ४३ हजार ३९८, जिल्ह्य़ाबाहेरील ५,१७३ अशी एकूण ४ लाख ८२ हजार ३७७ व्यक्तींवर पोहोचली.

चाचण्या पुन्हा साडेसहा हजारांवर

शहरात दिवसभरात ४ हजार ९७२, ग्रामीणला १ हजार ६२३ अशा एकूण ६ हजार ५९५ चाचण्या झाल्या. ही संख्या सोमवारी जिल्ह्य़ात केवळ ३ हजार ४३४ इतकी होती.

विदर्भात करोनाचे २ मृत्यू; ५१ रुग्णांची भर

करोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर सोमवारी विदर्भातील रुग्णसंख्या प्रथमच चाळीसहून खाली नोंदवली गेली होती. मंगळवारी पुन्हा त्यात किंचित वाढ होऊन ती ५१ झाली. विदर्भात २४ तासांत बुलढाण्यातील २ मृत्यू वगळता इतरत्र मृत्यू नाही. गडचिरोलीत दोन आकडी तर इतर दहा जिल्ह्य़ांत एक आकडीच नवीन रुग्ण आढळले. नागपूर जिल्ह्य़ात मंगळवारी एकही मृत्यू नसला तरी ८ नवीन रुग्ण आढळले. अमरावतीत ० मृत्यू तर ८ रुग्ण, चंद्रपूरला ० मृत्यू तर ४ रुग्ण, गडचिरोलीत ० मृत्यू तर ११ रुग्ण, यवतमाळला ० मृत्यू तर २ रुग्ण, भंडाऱ्यात ० मृत्यू तर २ रुग्ण, गोंदियात एकही मृत्यू व रुग्ण नोंदवला नाही. वाशीमला ० मृत्यू तर ४ रुग्ण, अकोल्यात ० मृत्यू तर ३ रुग्ण, बुलढाण्यात २ मृत्यू तर ७ रुग्ण, वर्धेत ० मृत्यू तर २ रुग्ण आढळले.

वयोवृद्ध, आजारी व्यक्तींना घरी जाऊन लस

वृद्धापकाळामुळे घराबाहेर पडू न शकणाऱ्या किंवा आजारी असल्याने घरीच उपचार सुरू असलेल्या नागरिकांना महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी  घरी जाऊन करोना प्रतिबंधक लस देणार आहेत. या संदर्भात महापालिकेने नुकतेच एक पत्रक जारी करून याबाबत माहिती दिली आहे. ही मोहीम केवळ घरी खाटेवर उपचार घेणाऱ्या व्यक्तींसाठी अथवा विशेष व्यक्तींसाठी राबवण्यात येणार आहे. यासाठी  https://forms.gle/NzYDUWcwQJmqsDPT8  ही लिंक  असून त्या लिंकवर ज्या व्यक्तीची नोंदणी करायची आहे, तिची संपूर्ण माहिती भरायची आहे. आवश्यक ते कागदपत्र सोबत अपलोड करायचे आहेत. माहितीची आणि कागदपत्रांची शहानिशा केल्यानंतर  पथक संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याचे लसीकरण करेल.  यापूर्वी महापालिकेने यशवंत स्टेडियम येथे विशेष व्यक्तींसाठी लसीकरणासाठी केंद्र सुरू केले आहे तसेच ग्लोकल मॉल येथे ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन’च्या माध्यमातून विशेष व्यक्तींना करोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. नागरिकांनी या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 12:57 am

Web Title: active coronavirus cases less than three hundred in nagpur district zws 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नागनदीसह अनेक नाल्यांवर सुरक्षा भिंत नाही
2 साई मंदिरातील सदस्यत्वासंदर्भात डोक्याचा वापर करा
3 वीस हजार करोना विधवांच्या मदतीसाठी दीडशे संस्थांचे प्रयत्न
Just Now!
X