News Flash

नाटय़ संमेलनात कलावंतांच्या प्रश्नांवर चर्चा व्हावी

रंगभूमीच्या क्षेत्रात सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून या रंगभूमीकडे बघितले जाते.

अभिनेते विलास उजवणे

अभिनेते विलास उजवणे यांचे मत -लोकसत्ताला सदिच्छा भेट

नागपूर : नाटय़ संमेलनातील ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याने दरवर्षी तेच ते ठराव पुन्हा संमेलनात येतात. अनेक कलावंतही  फिरकत नाहीत. त्यामुळे  केवळ सरकार, सह्य़ोगी संस्था, प्रायोजकांपर्यंतच नाटय़ संमेलने मार्यादित झाली आहेत. प्रत्यक्षात संमेलनात कलावंताच्या प्रश्नांविषयी संमेलनात चर्चा होणे अपेक्षित आहे, असे मत प्रसिद्ध अभिनेते विलास उजवणे यांनी व्यक्त केले.

नागपूरमध्ये होत असलेल्या ९९ व्या अखिल भारतीय नाटय़ संमेलनाच्या निमित्ताने मूळचे नागपूरकर पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत स्थायिक असलेले विलास उजवणे यांनी लोकसत्ता कार्यालयात भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. नागपुरात १८८५ नंतर  जवळपासू ३३ वर्षांनी नाटय़ संमेलन होत आहे. नागपूर आता सांस्कृतिकदृष्टय़ा समोर जात आहे. यापूर्वी अनेक नाटय़संमेलनात सहभागी झालो. मात्र गेल्या काही वर्षांत संमेलनाला केवळ ‘गेट टू गेदर’ चे स्वरूप आले आहे. विचारांचे आदानप्रदान किंवा कलावंतांच्या प्रश्नांविषयी संमेलनात चर्चा होणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. मनोरंजनाचे कार्यक्रम होतात. नवीन कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. मात्र त्यासोबतच कलावंत आणि पडद्यामागील कलावंतांच्या प्रश्नांचा विचार केला पाहिजे, असे उजवणे म्हणाले.

नाटय़ संमेलनाच्या तारखा दोन महिने आधी ठरतात. नाटय़ कलावंतांनी त्याच दिवशी एक दिवस मी संमेलनासाठी देईल, असे ठरवले तर संमेलनात कलावंतांची उपस्थिती वाढेल. प्रत्येक कलावंताचे कार्यक्रम ठरलेले असतात. मालिकांच्या चित्रिकरणाच्या वेळा ठरलेल्या असतात. कोणाची व्यावसायिक नाटकं असतात. तरीही कलावंतांनी संमेलनासाठी वेळ काढायला हवा. मात्र हे होताना दिसत नाही, अशी खंत उजवणे यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागात अनेक कलावंत आहेत. विशेषत: झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भाची शान आहे. रंगभूमीच्या क्षेत्रात सर्वात मोठे आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून या रंगभूमीकडे बघितले जाते. मुंबई पुण्याचे कलावंत तेथे येत असतात. मात्र, या रंगभूमीचा प्रसार करण्यात आपणही कुठे कमी पडतो याचा विचार करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

मतभेद विसरून संमेलन यशस्वी करा

मी नागपूरकर असल्याने मी संमेलनात सेलिब्रिटी म्हणून नाही तर कलावंत म्हणून सहभागी होणार आहे. नाटय़ संमेलन आयोजित करणे हे मोठे आव्हान असते. तयारीसाठी आयोजक एक महिन्याभरापासून मेहनत घेत आहेत. त्यामुळे नाटय़  क्षेत्रातील सर्वानी मतभेद विसरून  संमेलन यशस्वी करावे, असे उजवणे म्हणाले.

विदर्भातील कलावंतात इच्छाशक्तीचा अभाव

एकांकिका स्पर्धेत विदर्भातील अनेक संस्थांनी दर्जेदार प्रयोग सादर केले. आपल्याकडे चांगले कलावंत, लेखक आहेत, मात्र चिकाटी आणि इच्छाशक्तीचा अभाव आहे. नागपूर हे पाण्याचे डबके आहे, तर मुंबई-पुणे समुद्र आहे. आपण डबक्यात पोहू शकत नसू तर समुद्रात पोहणे कठीण आहे. नागपूरमध्ये हिंदी भाषिक मोठय़ा प्रमाणात आहेत. दोन किंवा तीन प्रयोग झाले की त्यानंतर नाटकाला गर्दी होत नाही. मुंबई पुण्याकडे प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल जातो. चित्रपट नगरी सुद्धा नागपुरात निर्माण होऊ शकते आणि तेवढी क्षमता येथे आहे,असेही उजवणे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 12:13 am

Web Title: discuss the questions of the artists in the natya sammelan vilas ujawane
Next Stories
1 मराठी नाटय़ संमेलनाची आज नागपुरात ‘नांदी’
2 ऐकावे ते नवीनच! रस्ताच चोरीला गेल्याची तक्रार
3 सलग ६० तासांच्या नाटय़जागराची उत्सुकता शिगेला
Just Now!
X