नागपूर : दहावी, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांसाठी आता सुवर्णसंधी आहे.तुम्ही जर शासकीय नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. शासकीय नोकरीचे स्वप्न हे प्रत्येक तरुण रंगवत असतात. मात्र, अलिकडे अनेकदा जाहिराती येत नसल्याने त्यांचा भ्रमनिराश होतो.मात्र, आता महाराष्ट्राच्या न्यायालयांमध्ये तब्बल २ हजार २२८ पदांची भरती होणार आहे. यामुळे अनेक तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आताच तयारी करा आणि अभ्यासाला लागा.

मुंबई उच्च न्यायालय, नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाकरिता नव्याने २ हजार २२८ पदांची निर्मिती करण्यास करण्यास राज्य सराकरने मान्यता दिली आहे.न्यायालयीन कामकाज गतीने होण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्याचबरोबर न्यायालयीन कामकाजामध्ये माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुध्दीमत्तेचा जास्तीत जास्त वापर करुन कामकाज गतीमान होण्याच्या दृष्टीने २ हजार २२८ पदे निर्माण करण्यात आली आहे. न्यायालयीन प्रक्रीया गतीमान होण्याच्या दृष्टीने आणि नागरिकांच्या सुविधेसाठी या पदाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मूळ शाखा व अपील शाखा आणि औरंगाबाद व नागपूर खंडपीठाकरिता गट-अ ते गट-ड संवर्गात अतिरिक्त पदांची निर्मिती करण्यात येत आहे. त्यानुषंगाने पदनिर्मिती करण्याचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावाला आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या पद निर्मितीसह या पदांसाठीच्या वेतन अनुदान व अनुषांगिक खर्चाच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. यामुळे आता लवकरच २ हजार २२८ पदांवर भरती होणार असल्याने अनेकांच्या हाताला नोकरी मिळणार आहे.

कुठल्या पदांचा समावेश असताणार

न्यायालयामध्ये पदभरती होणार असली तरी कुठल्या पदावर किती पदे भरली जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. असे असले तरी न्यायालयामध्ये साधारणता सहाय्यक, टंकलेखक, कॉपीस्ट, परीक्षक अशा विविध पदांवर भरती केली जाते. त्यामुळे तुम्हाला जर न्यायालयात नोकरी हवी असेल तर तुम्हाला या पदांची तयारी करणे आवश्यक राहणार आहे. टंकलेखक पदासाठी तुम्हाला टायपींग येणे आवश्यक आहे. यासाठी परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यामुळे पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमदेवारांसाठी ही चांगली संधी राहणार आहे. सध्या स्पर्धेचे युग आहे. त्यामुळे आतापासूनच अभ्यासाची तयारी करणे सर्वांसाठी महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना आतापासून अभ्यासाला लागा असा सल्ला देता येईल.