गोंदिया: विविध कारणांनी रखडत  अखेर तब्बल १३ वर्षांनंतर होणाऱ्या गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी निवडणुकीत १६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत . निवडणुकीत माजी कॅबिनेट मंत्री आणि अर्जुनी मोरगाव चे विद्यमान आमदार राजकुमार बडोले देखील रिंगणात आहेत, गेल्या २० वर्षांपासून या बँकेचे अध्यक्ष असलेले माजी आमदार राजेंद्र जैन पुन्हा रिंगणात आहेत. तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले, तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड, आमगावचे माजी आमदार भेरसिंग नागपुरे, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांचे पुत्र प्रफुल्ल अग्रवाल, विशाल अग्रवाल हेही या निवडणुकीत रिंगणात आहेत.

शिवसेनेचे गोंदिया जिल्हाप्रमुख मुकेश शिवहरे हेही महायुती फोडून भाजप-राष्ट्रवादी सोबत युतीत सहभागी न केल्यामुळे शिवसेना (शिंदे गट) वेगळे ठेवण्यासाठी रिंगणात आहेत. उद्धव शिवसेनेचे गोंदिया जिल्हाप्रमुख पंकज यादव, बँकेचे माजी संचालक राजकुमार कुथे, अशोक (गप्पू) गुप्ता हेही उमेदवार आहेत.या दिग्गज नेत्यांसह बँकेचे मावळते सचिव अविनाश जैस्वाल, उपाध्यक्ष राधेलाल पटेल, रेखलाल टेंभेरे, विजय राणे, केतन तुरकर, माजी नगर सेविका भावना कदम, प्रिया हरिणखेडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई मेंढे, सुभाष आकरे, प्रमोद संगीडवार, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांच्यासह १६३ उमेदवार रिंगणात आहेत यांनी नामांकन दाखल केले आहे.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या २० जागांसाठी इतक्या मोठ्या संख्येने नेते निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक रोमांचक आणि चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपने युती करून एकूण २० पैकी. १०-१० जागांचा फॉर्म्युला ठरवून उमेदवार उभे केले आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेस आणि शिवसेनेनेही उमेदवार उभे करून निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे.यात गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये बँकेचे माजी उपाध्यक्ष राधेलाल पटेल, प्रफुल्ल अग्रवाल, अशोक( गप्पू )गुप्ता, माजी आमदार दिलीप बनसोड, उषा मेंढे, विशाल अग्रवाल, जगदीश येरोला यांच्यासह अनेक  नेते रिंगणात आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२९ जून रोजी होणाऱ्या जीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत सत्ता कोणत्या दिशेने वळते हे येणारा काळच सांगेल, परंतु माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले,विजय रहांगडाले, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, दिलीप बनसोड, हे निवडणूक त्यांच्या बाजूने आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.