लोकसत्ता टीम

नागपूर: महानिर्मितीच्या चंद्रपूर वीज निर्मिती प्रकल्पातील संच क्रमांक ३ मधून यापूर्वी सलग २६६ दिवस वीज निर्मिती झाली होती. हा विक्रम पारस वीज निर्मिती केंद्रातील संच क्रमांक ४ ने मोडला. पारसमधील या संचातून ९ एप्रिल २०२४ रोजी २६७ दिवसांपासून अखंडित वीज निर्मिती सुरू आहे. त्यामुळे या पद्धतीची कामगिरी इतर संचांनी केल्यास उन्हाळ्यात वीज संकट जाणवणार नाही असा, तज्ज्ञांचा अंदाज आहे.

Mahanirmiti, Power crisis, maharashtra,
राज्यावर वीजसंकटाचे सावट! महानिर्मितीकडे १५ दिवस पुरेल एवढाच कोळसा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
MLA chandrakanat Patil is upset as Eknath Khadse will return to BJP
खडसे भाजपमध्ये परतणार असल्याने आमदार पाटील अस्वस्थ
UPSC Result, UPSC Result Marathi News, UPSC Civil Services Final Result 2023 Out
यूपीएससी परीक्षेत विदर्भाचा डंका, नागपूरच्या पाच विद्यार्थ्यांनी मारली बाजी

राज्यात महानिर्मितीच्या पारस वीज केंद्रातील संच क्रमांक ४ मधून (२५० मेगावॅट) गेल्या २६७ दिवसांपासून अखंडित वीज निर्मिती सुरू आहे. यापूर्वी २१० मेगावॅटच्या चंद्रपूर केंद्रातील संच क्रमांक- ३ मधून २००९ मध्ये २६६ दिवस अखंडित वीज निर्मिती नोंदवली गेली होती. हा विक्रम मोडून पारसमध्ये ९ एप्रिल २०२४ रोजी सलग अखंडित वीज निर्मिती सुरु असल्याचा विक्रम पारसमधील या केंद्राने नोंदवला. येथील संच क्रमांक ४ ने ९ एप्रिल २०२४ रोजी २६७ दिवसांत १३८५.१ मिलियन युनिटस आणि सरासरी २१६ मेगावॅट सह वीज निर्मिती केली.

आणखी वाचा-गुढी पाडव्याच्या दिवशीच चार तासात सोन्याच्या दरात उसळी; ‘हे’ आहे आजचे विक्रमी दर…

या केंद्रायी राज्य वीज नियामक आयोग आणि केंद्रिय विद्युत प्राधिकरणाचे उत्तम कामगिरी केली. या केंद्राने नोव्हेंबर- २०२३ मध्ये ९०.२२ टक्के, जानेवारी- २०२४ मध्ये ९१.०२ टक्के आणि फेब्रुवारी-२०२४ मध्ये ९५.५५ टक्के मासिक महाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या उपलब्धता घटक वर ‘शून्य नामंजूर’ लक्ष्य साध्य केले. या केंद्रात २०२३- २०२४ आर्थिक वर्षासाठी फेब्रुवारी- २०२४ मध्ये ९३.९७ टक्के असे सर्वाधिक मासिक केंद्रीय विद्युत प्राधिकरण भारांक गाठले. या केंद्राने ऑगस्ट- २०२३ पासून मासिक विशिष्ट इंधन वापर वर ‘शून्य अस्वीकृती’ प्राप्त केली.

“उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी लक्षात घेता, पारस वीज केंद्र आपला नावलौकिक कायम राखत महत्तम वीज उत्पादनासाठी सज्ज आहे” -शरद भगत, मुख्य अभियंता, पारस औष्णिक विद्युत केंद्र, महानिर्मिती.