चंद्रपूर : २९ जानेवारीला झालेल्या जागतिक अलामा अब्याकस स्पर्धेत भद्रावती तालुक्यातील मुरसा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे शिक्षक एस.एच. मानकर यांचा मुलगा तसेच भद्रावती येथील साई कॉन्व्हेंटच इयत्ता पाचवीचा विद्यार्थी स्पंदन मानकर याने जगातून दुसरा नंबर पटकाविला.

हेही वाचा >>>सीबीआयने ‘वेकोलि’च्या अधिकाऱ्याला एक लाखाची लाच घेताना केली अटक

या वर्षी तीसऱ्यांदा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या १८ व्या अलामा अब्याकस स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. गणितीय उदाहरणाची सोप्या पद्धतीने उत्तरे काढणाऱ्या या अभिनव स्पर्धेत स्पर्धकांना ७ मिनिटात १२० प्रश्न विचारण्यात आले होते. स्पर्धेत जगातील ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दुबई, मलेशिया, अबुधाबी, सिंगापूर, सौदी अरेबिया, इराण, भारत या देशातून हजारो स्पर्धक सहभागी झाले होते. यात ज्युनियर गटात भद्रावतीच्या स्पंदन श्रीमंत मानकर याने जगातून दुसरा क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, स्पंदन २०२० मध्ये देशात पहिला आला होता तर २०२२ मध्ये पण जगात दुसरा आला होता. स्पंदनचा नुकताच हैद्राबाद येथे अलामा अब्याकसचे दिग्दर्शक जी. मुथुकुमार अय्यर, मिनाक्षी नेरकर मॅडम यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पदक आणि प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

हेही वाचा >>>शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदव्युत्तरच्या निम्म्या जागांमध्ये घट! नियमित ऐवजी कंत्राटी शिक्षक नियुक्तीचा परिणाम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्पंदनने आपल्या यशाचे श्रेय आई रेणू मानकर, वडील श्रीमंत मानकर, अलामा अब्याकसचे दिग्दर्शक पद्मावती मुथुकुमार, जी. मूथुकुमार अय्यर, वाणी रामजी मॅडम, शिक्षिका मिनाक्षी नेरकर व टी. एस. नेरकर सर यांना दिले आहे. या यशाबद्दल स्पंदनचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे