नागपूर : मेडिकल रुग्णालयाच्या एका डॉक्टरला सायबर गुन्हेगारांनी एमडी तस्करीची भीती दाखवून तीन लाखांनी फसवणूक केली. या प्रकरणी अजनी पोलिसांनी सायबर गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला. यावेळी आरोपींनी थेट सायबर पोलीस ठाण्यातून बोलत असल्याचे सांगून रक्कम लुबाडली हे विशेष.

डॉ. कौशिकी हलदर (नोएडा, उत्तरप्रदेश) हे मेडिकल रुग्णालय आणि महाविद्यालयात वैद्यकिय शिक्षण घेतात आणि नोकरी करतात. वसतीगृहात आराम करीत असताना बुधवारी एक फोन आला. ‘मी फेडेक्स कुरिअर कंपनीतून बोलत असून तुमचे एक पार्सल पोलिसांनी जप्त केले आहे.’ अशी माहिती दिली. त्यानंतर काही वेळातच अंधेरी सायबर बोलीस ठाण्यातून फोन आला. पोलीस अधिकारी असल्याचे सांगून डॉ. हलदर यांना अटक करण्याची भीती दाखवली.

हेही वाचा >>> प्रेयसीच्या भावाचा फोन आला अन् घोळ झाला; मारहाणीच्या भीतीने अल्पवयीन प्रेमीयुगुलाचे पलायन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘तुमचे पार्सल मुंबई ते तायवान जात असून त्यात १४० ग्रँम एमडी ड्रग्स आहे. त्यामुळे तुमचे बँक खाते आरबीआयला तपासायचे आहे. त्यामुळे बँक खात्याबाबत सर्व माहिती द्या’ अशी भीती दाखवली. डॉ. हलदर यांनी घाबरून दोन बँक खात्याची माहिती सायबर गुन्हेगारांना दिली. आरोपींनी डॉक्टरच्या खात्यातून ३ लाख रुपये काढले. काही वेळानंतर फसवणूक झाल्याचा प्रकार लक्षात आला. या प्रकरणी अजनी ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला.