नागपूर : रेल्वेने लांबचा प्रवास करीत असताना आजारी व्यक्तीने आवश्यक ती काळजी घ्यावी लागते. अशा व्यक्तीसोबत परिचित व्यक्तीने प्रवास करणे उत्तम ठरते. त्यामुळे अचानक आजार बळावला तर तातडीची मदत मिळू शकते. एकट्याने प्रवास करीत असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि नागपूर रेल्वे स्थानकावर बंगळुरू-दानापूर संघमित्रा एक्स्प्रेस पोहोचल्यावर ही घटना उघडकीस आली.

हेही वाचा – चंद्रपूर : “एसबीआय कर्ज घोटाळाप्रकरणी फॉरेन्सिक ऑडिट करा”, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी; १५ दिवसांत दोषारोपपत्र दाखल न केल्यास आंदोलनाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघमित्रा एक्स्प्रेसच्या एसएलआर डब्यात शौचालयात एका प्रवाशाचा मृतदेह आढळला. ही व्यक्ती बेंगळुरूहून बिहारमधील औरंगाबादकडे जात होती. ही एक्सप्रेस नागपूरला गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास आली. प्रवासी उतरण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ आले. त्यामुळे येथे गर्दी झाली होती. त्याचवेळी काही प्रवाशी शौचालयात जाण्याच्या प्रतिक्षेत होते. बराचवेळ झाला तरी शौचालयाचा दार उघडला जात नव्हता. आवाज दिला तर आतून प्रतिसाद मिळत नव्हता. म्हणून काही प्रवाशांनी रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दलास कळवले. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी शौचालयाचे दार तोडले, तर एक व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली. त्याच्या खिश्यात आधार कार्ड आणि रेल्वेचे तिकीट होते. त्याचे नाव रामसेवक भूहिया असून तो ३८ वर्षांचा आहे. तो बिहारमधील औरंगाबादचा रहिवासी आहे. लोहमार्ग पोलिसांनी मृतदेह इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.