नागपूर: एकतर्फी प्रेमातून फेसबुक फ्रेंडने विवाहित महिलेशी अश्लील चाळे करून विनयभंग केला. ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत घडली. पोलिसांनी पीडित २० वर्षीय महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत आरोपी तरुणाला अटक केली. सचिन मनोज मून (२०) रा. एमआयडीसी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सचिनने यापूर्वीही महिलेशी सलगी करण्याचा प्रयत्न करीत पाठलाग केला होता. त्या प्रकरणातसुद्धा महिलेने पोलिसात तक्रार केली होती.
अंबाझरी हद्दीत राहणाऱ्या पीडिते महिलेची आरोपी सचिनशी फेसबुकवर ओळख झाली. दोघांमध्ये काही दिवस ‘चॅटिंग’ सुरू होऊन लवकरच मैत्री झाली. मैत्रीनंतर दोघांच्या भेटीगाठीही सुरू झाल्या.

हेही वाचा… दहावी पास आहात, एस. टी. महामंडळात नोकरीची संधी, अर्ज करा आणि…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान सचिन महिलेवर एकतर्फी प्रेम करू लागला. महिलेला याबाबत समजताच तिने त्याच्यापासून दुरावा केला. यामुळे सचिन संतापला. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास सचिनने पीडितेला पाठलाग केला. भररस्त्यात तिला अडवून शिविगाळ केली. जिवे मारण्याची धमकी देत त्याच्याशी संबंध न तोडण्यास सांगितले. इतकेच नाहीतर महिलेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. महिलेने घटनेची तक्रार अंबाझरी पोलिसात केली. पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व धमकीचा गुन्हा नोंदवून सचिनला अटक केली.