स्वतःच्याच १२ आणि १४ वर्षांच्या मुलींवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपी वडिलाला आता उरलेले आयुष्य तुरुंगात घालवावे लागणार आहे. या क्रूर वडिलाला नागपूरच्या विशेष पोक्सो न्यायालयाने दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा- कारागृहातील ‘मदर सेल’अभावी चिमुकल्यांचे हाल

दोषी आरोपी हा तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे. तो व्यवसायाने ऑटोचालक आहे. या नराधमाने जून २०१९ ते नोव्हेंबर २०२० या कालावधीत आपल्या दोन्ही मुलींवर अनेकदा बलात्कार केला. पीडित मुली या आरोपीच्या पहिल्या पत्नीच्या मुली आहेत. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर आरोपीने हे कृत्य केले. त्याने दुसरे लग्नही केले. परंतु, त्याने मुलींवर बलात्कार करणे थांबवले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपीची दुसरी पत्नी, भाऊ आणि वहिनी यांनाही या कृत्याची माहिती होती. मात्र, त्यांनी तोंड बंद ठेवले. अखेर मोठ्या मुलीने स्वत: पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा सांगितली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी वडील, त्याची दुसरी पत्नी, भाऊ आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा- नागपूर-बिलासपूर ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला प्रवासी मिळेनात!

२१ नोव्हेंबर २०२० रोजी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणी न्यायालयाने बलात्कारी पित्याला दुहेरी जन्मठेप आणि २००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारच्या वतीने सरकारी वकील रश्मी खापरडे यांनी बाजू मांडली.