यवतमाळ : मारेगाव शहरातील एका कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा येथीलच एका युवकाने बळजबरी करून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.मुलीच्या काकूने हा प्रयत्न हाणून पडल्यानंतर तरूणाने बदनामीच्या धाकाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. श्रावण गणपत वेरणे (२३) असे आरोपीचे नाव आहे.

पीडिता मारेगाव तालुक्यात एका गावामध्ये तिच्या आई – वडिलांसोबत राहते. तिच्या घरा शेजारीच आरोपी राहतो. बुधवारी पीडितेचे कुटुंबीय देवकार्यासाठी बाहेरगावी गेले होते. पीडिता घरी एकटीच असताना आरोपी हा तिच्या घरी गेला व पीडितेला त्याच्या घरी चलण्यासाठी जबरदस्ती करू लागला. पीडितेने नकार दिला असता त्याने मुलीशी जबरदस्ती करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीडितेने आरोपीला धक्का देऊन आरडाओरड केली. गोंधळ ऐकून घराशेजारीच राहत असलेली पीडितेची काकू धावत आली. काकूने आरोपीला मुलीला हात कसा लावला, अशी विचारणा केली असता आरोपीने काकूला धमकी दिली. तसेच याची कुणाजवळ वाच्यता केली तर कोणालाही सोडणार नाही, अशी धमकी त्याने दोघींना दिली. या झटापटीत मुलीच्या हाताला दुखापत झाली.

हेही वाचा >>>नागपूर : जगातील सर्वात लहान चरखा, लांबी ३.२० मिमीची, सूतही काढता येतं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पीडितेचेकुटुंबीय घरी परतताना दिसताच आरोपीने तेथून पळ काढला. पीडितेने सदर घटना कुटुंबीयांना सांगून संध्याकाळी मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी विरोधात पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. अधिक तपास मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी करत आहे.आरोपीने पीडितेचा विनयभंग करण्याच्या प्रयत्नात असताना मुलीने आरडा ओरड केल्याने तिची काकू घटनास्थळावर आली. मुलीने झालेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. त्यामुळे गावात बदनामी होईल या भीतीने आरोपीने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याचे लक्षात येताच आरोपीच्या कुटुंबीयांनी त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याच्यावर चंद्रपूर येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहे.