नागपूर : एका वयोवृद्ध प्रवाशाला बॅटरी कारने एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावार जायचे होते. त्यांच्यासोबत एक नातवाईक होते. बॅटरी कार चालकाने तिकडे जाण्यास नकार दिल्याने प्रवाशाच्या नातेवाईकाने तलवार काढली. ही थरारक घटना मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावर गुरुवारी सकाळी घडली.

एका वयोवृद्ध प्रवाशाला मुख्य प्रवेशद्वाराकडून (फलाट क्रमांक १) फलाट क्रमांक ८ वर जायचे होते. त्यांनी तशी विनंती बॅटरी कारचालकाला केली. चालकाने कार फलाट क्रमांक ८ वर जाऊ शकत नाही. कारचा आकार मोठा आहे आणि तिकडे जाणारा पादचारी पूल अरुंद आहे असे प्रवाशाला सांगितले. हे संभाषण ऐकून प्रवाशाच्या नातवाईकाने फलाट क्रमांक ८ वर नेण्याचा आग्रह धरला. कार चालकाने तरीही नकार दिला. हे ऐकून प्रवाशाचा नातवाईक संतापला आणि त्याने चक्क तलवार काढली. चालकाला धमकावले. तलवार बघून चालक घाबरला आणि त्याने कार सोडून धूम ठोकली.

हेही वाचा – नागपूर : आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाख, उच्च शिक्षित शेतकऱ्याची किमया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक आर. एल. मीना म्हणाले, बॅटरी कारचालकाला बोलावून घेतले आहे. त्याच्या तक्रारीनंतर अधिक तपशील कळू शकेल.