नागपूर : शहरातील अनेक ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले असून आणखी काही उड्डाणपुलांचे काम सुरू आहे. या उड्डाणपुलाखालील जागाचा वापर बास्केटबॉल कोर्ट, ग्रीन जिमसाठी करण्यात आली आहे. विविध उड्डणापुलाखाली असलेल्या खाली जागांना युवकांच्या आवडत्या खेळचे मैदान म्हणून विकसित करण्यात आले आहे.

विशेषतः दिघोरी उड्डाणपुलाखाली बॉस्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग तयार करण्यात आले असून, नरेंद्रनगर उड्डाणपूला खाली देखील युवकांसाठी असे क्रीडांगण तयार केले जात आहे. अशाच प्रकारचे मैदान यापूर्वी इतर शहरांमध्ये बघायला मिळायचे पण, आता नागपुरातही याप्रकारचे मैदान तयार केले जात आहेत.शहरात असलेल्या विविध उड्डणापुलाखाली लॅडस्केपिंग आणि सौंदर्यीकरण करण्यात आल्याने शहराच्या वैभवात अधिक भर पडली आहे. नागरिकांनाही एक सुंदर आणि आल्हाददायक वातावरण मिळत आहे.

जी-२० अंतर्गत शहरातील जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनच्या भिंत, दिघोरी, सक्करदरा, मेहंदीबाग आणि दहीबाजार उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग व सुशोभीकरण करण्यात आले आहे. विविध उड्डाणपूलाखाली पूर्वी दुर्लक्षित असलेल्या जागा आता हिरवीगार झाडे, फुले आणि कलात्मकतेने सजल्या आहेत. जयप्रकाशनगर मेट्रो स्टेशनच्या भिंतीवर ग्राफीटी वर्क, महिलांच्या जीवनासह सायकलचे भित्तीचित्र तयार करण्यात आले आहे. मेट्रो स्टेशनची भिंत आकर्षक म्युरलमध्ये रुपांतरीत करण्यात आली आहे. नागपूरची टायगर कॅपिटल आणि संत्र्याचे शहर म्हणून ओळख दर्शविते. याशिवाय ठकळ रंग, वनस्पती आणि वन्यजीवाचे चित्रण देखील यावर रेखाटण्यात आले आहेत. वर्धा मार्गावर एक दृश्य लँडमार्क म्हणून आपली नवीन ओळख निर्माण केली आहे.

दिघोरी उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग व सुशोभीकरण करण्यात आले आहे. येथील अतिक्रण काढून, जागेच स्वच्छ आणि सुव्यवस्थित विकास करण्यात आला आहे. नागरिकांसाठी बसण्याची सोय, रुग्णालय येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकसाठी प्रतीक्षा क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आले आहे. याशिवाय बॉस्केटबॉल कोर्ट तयार करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांसाठी याठिकाणी स्केटिंग ट्रँक तयार करण्यात आले आहे.

सक्करदरा उड्डाणपुलाखालील भागाचा विकास केला आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात अधिक भर पडली आहे. ठिकाणी बसण्याची प्रशस्त सुविधा असल्याने या ठिकाणी नागरिकांना शांततेत बसता येते. शिवाय हिरवळ आणि रंगीबेरंगी स्तंभकला तयार करून शहराच्या सौंदर्यीकरणात अधिक भर पडली आहे. इंद्रधनुष्य रंगातील एमएस छत्र्यांची आकर्षक स्थापना करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेहंदीबाग उड्डाणपुलाखाली लँडस्केपिंग आणि सुशोभीकरणाचे काम करुन घनदाट वस्तीतील नागरिकांकरिता आनंदायी वातावरण निर्माण करण्याचे काम करण्यात आले आहे. उड्डाणपुलाच्या स्तंभाचा विकास झाडांसारखा करण्यात आला आहे तर दही बाजार उड्डाणपूल हा गजबजलेल्या बाजार क्षेत्रात स्थित आहे. या उडाणपूलाखाली दुकानदार आणि ग्राहकांसाठी शांततामय विश्रांतीस्थान म्हणून विकसित करण्यात आले आहे. उडाणपूलांचे स्तंभाची झाडांसारखी रचना करण्यात आली असल्याने सौंदर्यात अधिक भर पडली आहेत.