नागपूर: रेल्वेगाडी ज्वलनशील पदार्थ, वस्तू नेण्यास मनाई असताना फटाके घेऊन प्रवास करणाऱ्या ११ जणांविरुद्ध रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाई केली.

ज्वलनशील वस्तू रेल्वेगाडीतून प्रवास करणाऱ्यांना भारतीय रेल्वे कायद्याच्या कलम १६४ अंतर्गंत कारवाई करण्यात येते. संबंधितांवर एक हजार रुपयांचे दंड किंवा तीन वर्षांचा तरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.

हेही वाचा… नागपूर: भावाच्या मुलीवर बलात्कार करून काका फरार; मुलीची प्रकृती गंभीर

फटाके प्रतिबंधित वस्तू आहे. त्यामुळे दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने दिवाळी तोंडावर विशेष तपास मोहीम हाती घेतली आहे. यावेळी वेगवेगेळ्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या ११ जणांना फटाके बाळगल्याबद्दल कारवाई करण्यात आली.