चंद्रपूर : एकीचे बळ असेल तर कितीही मोठे संकट आले तरी त्यातून आपणाला सुखरूप बाहेर पडता येऊ शकते. वाघाने रानगव्याची अतिशय चपळाईने शिकार केलीच होती, पण त्याच्या मदतीला दुसरा रानगवा धावून आला. रानगव्याचे रौद्ररूप पाहून वाघ घाबरला अन् जीव मुठीत घेऊन पळाला. शनिवारी सायंकाळी ताडोबात वाघ आणि रानगव्याच्या झुंझीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांचा मुक्तसंचार बघायला मिळत आहे. वाघांचा मुक्तपणे संचार सुरू असतानाच जंगलातील दोन वाघांची झुंज, शिकारीचे तसेच वाघ प्लास्टिक बॉटल सोबत खेळत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. ताडोबातील वाघांचे अनेक व्हिडिओ समोर येत असताना शनिवारी सायंकाळी एक नवीन व्हिडिओ समोर आला. शनिवारी सायंकाळी ताडोबात पुणे येथील एमआयटी कॉलेजचे विद्यार्थी जंगल सफारीसाठी आले होते.

loksatta ulta chasma
उलटा चष्मा: होऊ द्या ध्वनिप्रदूषण!
Florida woman’s pet dog scares off alligator Nail-biting video is viral
“क्या मगरमच्छ बनेगा रे तू!” कुत्र्याला पाहून मगरीने ठोकली धूम, पळत जाऊन तळ्यात मारली उडी! पाहा Viral Video
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
jackfruit keema recipe in marathi
Recipe : फणसाचा चमचमीत खिमा! Vegan आहार घेणारेदेखील आवडीने खातील; रेसिपी घ्या

हेही वाचा…आश्चर्य; लोणार सरोवर परिसरातील बिबट झाला सोनेरी…!

ताडोबाच्या मोहर्ली बफर झोनमध्ये वाघ अतिशय शांतपणे पानतळ्याच्या काठावर बसला होता. तेथे रानगवा आणि इतर पक्ष्यांचे थवे होते. अशातच वाघ अचानक एका रानगव्यावर झडप घालतो व शिकार करण्याच्या इराद्याने त्याची मान जबड्यात घट्ट पकडतो. नेमका त्याच वेळी दुसरा रानगवा आपल्या एका सोबत्याची वाघ शिकार करीत असल्याचे पाहून वाघाच्या दिशेने धाव घेतो. रानगव्याचे रौद्ररूप पाहून वाघ घाबरतो अन् जीव मुठीत घेऊन अक्षरशः पळ काढतो. हा व्हिडिओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अतिशय चपळाईने रानगव्याची शिकार करण्यासाठी झडप घेतली खरी परंतु एकीचे बळ पाहून वाघाला देखील पळ काढावा लागला.

हेही वाचा…विद्यावेतनाच्या मागणीवरून कामबंद! एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर दुसऱ्या दिवशीही संपावर

ताडोबा मोहर्ली बफर झोन मध्ये हा व्हिडिओ भूषण थेरे यांनी काढला आहे. मोहर्लीचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ शनिवार १७ फेब्रुवारी सायंकाळच्या सफरीचा आहे.