नागपूर : वस्तीत राहणाऱ्या युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत पत्नीच्या चारित्र्यावर वारंवार संशय पती घेत होता. पतीच्या मारहाणीला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी तक्रारीवरून पतीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. जितेंद्र चोटीराम केशवानी (४०, हुडको कॉलनी, जरीपटका) असे आरोपी पतीचे नाव आहे तर वंशिका (३२) असे मृत महिलेचे नाव आहे.

हेही वाचा…टिपेश्वर अभयारण्यातील ‘त्या’ वाघाची फासातून सुटका, शिकाऱ्यांनी लावला होता…

I experienced a golden age in advocacy asserted Justice Bhushan Gavai
‘‘वकिली करताना मी सुवर्ण काळ अनुभवला,” न्यायमूर्ती भूषण गवई यांचे प्रतिपादन; म्हणाले, “नवोदित वकिलांनी…”
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
nagpur crime news, suspicion of character nagpur
प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला पाजले विष, पोलिसांनी…
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब

जितेंद्र हा ई-रिक्शा चालवत होता. त्याला दारुचे व्यसन होते. पत्नी वंशिका आणि ८ वर्षाचा मुलगा यांच्यासोबत तो भाड्याने राहत होता. वस्तीतील एका युवकाशी पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय पती जितेंद्रला होता. त्याने अनेकदा पत्नीवर संशय घेऊन तिला मारहाण केली. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. तो पत्नीसह मुलालाही मारहाण करीत होता. त्यामुळे पतीच्या मारहाणीला पत्नी कंटाळली होती. तिने ३० ऑगस्टला घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी वंशिका यांची बहिण हेमा नागपाल यांनी जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.