अमरावती: एका तरुणीने मुंबई-अमरावती एक्सप्रेससमोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी नवाथे चौकानजीकच्‍या रुळावर उघडकीस आली होती. एका तरुणाच्या त्रासाला कंटाळून तिने हा आत्मघाती निर्णय घेतल्याचे आता समोर आले आहे. या प्रकरणी तिच्या वडिलांनी राजापेठ ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

गौरव मोरेश्वर हरणखेडे (२८, रा. रामेश्वर मंदिराजवळ, अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शनिवारी सकाळी ईशा (१८, रा. महाजनपुरा, अमरावती) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने मुंबई-अमरावती एक्स्प्रेस रेल्वेगाडीसमोर स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली होती. ही घटना उजेडात आल्यावर राजापेठ पोलिसांनी घटनास्थळ गाठूनपंचनामा केला. सर्वप्रथम मृत तरुणीची ओळख पटविण्यात आली. ओळख पटल्यावर तातडीने तिच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला. शवविच्छेदनानंतर तिचे पार्थिव कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

in amravati mob pelted stones at Nagpuri Gate police station demanding case against Yeti Narasimha
गाजियाबादचे पडसाद थेट अमरावतीत…जमाव पोलीस ठाण्यात धडकला आणि दगडफेक….
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
gold-plated prabhawal offered to Mahalakshmi
कोल्हापूर : सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ महालक्ष्मीला अर्पण
Thane, Husband wife suicide, Nadgaon area,
ठाणे : पती-पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या
man kills sister s boyfriend over love affairs in dehu road
पिंपरी- चिंचवड: बहिणीच्या प्रियकराची भावाने केली हत्या; तीन जण ताब्यात, आज सकाळीच आढळला होता मृतदेह
Lalbaugcha Raja Ganpati news
Lalbaug Raja Crown : लालबागच्या राजाचा मुकूट लॉकरमध्ये, अनंत अंबानींनी दिलेला २० किलो सोन्याचा अलंकार चर्चेत
young man visiting Srikshetra Olandeshwar swept away in Panganga River found dead after 20 hours
बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…

हेही वाचा… नागपुरात नवीन डेंग्यू संशयितांची चाचणी होणार कशी? नवीन किट्स आल्या पण…

दरम्यान, ईशाच्या वडिलांनी राजापेठ पोलीस ठाणे गाठून गौरव हरणखेडेविरुद्ध तक्रार दाखल केली. कॉलेजमध्ये ये-जा करीत असताना एक मुलगा आपणास त्रास देत असल्याची माहिती तिने आपल्याला दिली होती. ८ सप्टेंबर रोजी मुलगी ईशा आपल्याला तणावामध्ये दिसली. त्यामुळे आपण तिला विश्वासात घेऊन कारण विचारले. त्यावेळी तिने गौरव हरणखेडे हा आपल्याला त्रास देत आहे. वारंवार फोन करीत आहे. महाविद्यालय, शिकवणी वर्ग व घराकडे चकरा मारत आहे. आपण त्याला समजावून सांगितले. तरीदेखील तो ऐकत नसल्याचे तिने आपल्याला सांगितले होते. गौरवच्या त्रासामुळेच आपल्या मुलीने आत्महत्या केल्याचे त्यांनी तक्रार म्हटले. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गौरव हरणखेडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.