वाशीम : नागपूर – शिर्डी समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील इरळा इंटर चेंजजवळ नागपूर कडून मुंबई कडे भरधाव वेगाने जाणारे कंटेनर क्रमांक ओ डी ११ झेड ८११० च्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कठड्याला ला धडकून सकाळी ६ वाजेदरम्यात अपघात झाला. यामधे चालक जखमी झाले असून त्याला उपचारासाठी मालेगाव येथे दाखल करण्यात आले आहे.

समृद्धी महामार्गावर सातत्याने अपघात होत असल्याने महामार्ग चिंतेचा विषय बनला आहे. सोमवार २ मार्च रोजी ईरळा परिसरात एका चहा विक्रेत्याचा ट्रॅक अपघातात मृत्यू झाला होता. तर ६ मार्च रोजी औरंगाबाद कडून नागपूरकडे जात असलेल्या फॉर्च्यूनर गाडीचा भीषण अपघात झाला होता. त्यामध्ये गुजरात येथील सीमा गोयल ५० वर्षे व शामदास गोयल ५५ वर्षे हे गंभीर जखमी झाले होते. तर आज १० मार्च रोजी सकाळी समृद्धी महामार्गावर इरळा इंटर चेंज जवळ नागपूर येथून मुंबई कडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कठड्याला धडकून अपघात झाला. यामधे कुठलीही जीवितहानी झाली नसून चालक योगेंद्र यादव ३१ वर्षे जखमी झाले असून मालेगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा: धक्कादायक! हळद लागताच अल्पवयीन मुलीने प्रियकरासह ‘फिनाईल’ प्राशन केले अन्…

घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिस गणेश गावंडे,मधुकर देसाई, जऊळका पोलीस किशोर वानखेडे, दीपक कदम, निरंजन वानखेडे, कटेकर रुग्णवाहिके सह दाखल झाले. क्रेनच्या मदतीने सदर कंटेनर रस्त्याचा कडेला लावण्यात आला. सदर महामार्ग जनतेसाठी खुला होऊन तीन महिन्यात मोठ्या प्रमाणावर अपघाताचे सत्र सुरूच असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. यामुळे समृध्दी महामार्ग की मृत्यूचा सापळा असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा : बारावी गणिताच्या पेपर फूटप्रकरणी आणखी एकास अटक, आरोपींची संख्या आठवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेग मर्यादेचे उल्लंघन

समृद्धी महामार्गावर जड वाहनासाठी ८०, इतर वाहन चालकासाठी १०० व १२० ची वेग मर्यादा ठेवण्यात आली आहे. परंतु वाहन चालक वेग मर्यादा ओलांडून सुसाट वेगाने जात आहेत. यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तर रस्त्यावर अचानक येत असलेल्या वन्य प्राण्यांमुळे अपघात होत असल्याचे दिसून येते.