शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे आंतरवासिता विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ‘रॅगिंग’ घेतल्याचा धक्कादायक प्रकार एका चित्रफीतीतून पुढे आला आहे. ‘सेन्ट्रल रॅगिंग समिती’कडून मेडिकल प्रशासनाला तक्रार येताच येथील सहा विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यांची ‘इंटर्नशिप’ रद्द करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

मेडिकल प्रशासनाला सेंट्रल रॅगिंग कमिटीकडून एक चित्रफीत इ-मेलवर प्राप्त झाली होती. त्यात मेडिकलचे सहा इंटर्न एका प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची ‘रॅगिंग’ घेत असल्याचे पुढे आले. तक्रारीनंतर मेडिकल प्रशासनाने तडकाफडकी बैठक घेत चौकशी केली. त्यात ते रॅगिंग घेत असल्याचे स्पष्ट झाले.

हेही वाचा: नागपूर: शिंदे गट व उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद पेटणार कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर मेडिकल प्रशासनाने आंतरवासिता डॉक्टरची इंटर्नशिप रद्द करत त्यांना वसतिगृहातूनही बाहेर काढले. या सर्व विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या वृत्ताला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांनी दुजोरा दिला. मेडिकलमध्ये ‘रॅगिंग’चा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले.