नागपूर : पूर येऊन एक आठवडा उलटल्यावर राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सोमवारी २ ऑक्टोबरला नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत.

२२ सप्टेबरच्या रात्री अतिवृष्टी झाल्याने शनिवारी पहाटे नागपूर शहरातील नाल्यालगतच्या काही वस्त्यांमध्ये पाणी शिरले होते. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पीक हानी झाली होती. सध्या पंचनाम्याचे काम युद्ध पातळीवर सुरूआहे. शुक्रवारी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी नागपूर शहरातील पूरग्रस्त भागाचा दौरा करून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. पुन्हा अशा घटना टाळण्यासाठी सरकार काळजी घेईल, असे आश्वासन दिले. आता ग्रामीण भागातील पीक हानीचे सर्वेक्षण करण्यासाठी सोमवारी कृषीमंत्री धनंजय मुंडे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. ते उमरेड, मैदा, नागपूर ग्रामीण आणि कुही तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत.

हेही वाचा – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात आजपासून पर्यटनाला सुरुवात

हेही वाचा – उद्या हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना, काय आहे इतिहास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सकाळी १० ते सांयकाळी ५ अशी त्यांच्या दौऱ्याची वेळ आहे. मंत्री झाल्यावर प्रथमच मुंडे नागपूर दौऱ्यावर येत आहेत. यापूर्वी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला होता.