स्वयंघोषित समाज माध्यम विश्लेषक अजित पारसेला सोमवारी सायंकाळी एका व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. मात्र, त्याने व्यसनमुक्ती केंद्रातही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर विवेकानंदनगर चौकातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. आतापर्यंत पारसेने चार वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलिसांनीही त्याला अटक करण्यासाठी सावध पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा >>>नागपूर रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासासाठी ४८७ कोटी, जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार

नागपुरातील अनेक डॉक्टर्स, प्राध्यापक, शिक्षक, मोठमोठ्या व्यावसायिकांना केंद्रीय मंत्र्याचा खास माणूस असल्याचे सांगून पंतप्रधान कार्यालयातून कोट्यवधींचा निधी मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोटींमध्ये रक्कम हडपली आहे. अनेकांना त्याने दिल्लीतील सप्ततारांकित हॉटेलमध्ये नेऊन देशी-विदेशी तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडून काहींचे अश्लील छायाचित्र आणि चित्रफिती तयार केल्या आहेत. अश्लील छायाचित्र कुटुंबीयांना दाखवून किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन नागपुरातील काही व्यावसायिकांकडून कोटींमध्ये खंडणी घेतली आहे. बडकस चौकातील डॉ. राजेश मुरकुटे यांना होमियोपॅथी कॉलेजसाठी दिल्लीतील पीएमओ कार्यालयातून निधी मिळवून देण्याच्या नावाखाली आणि सीबीआयची कारवाई टाळण्यासाठी साडेचार कोटींची रक्कम उकळली आहे.

हेही वाचा >>>नागपूर: राज ठाकरेंचे आभार मानावे लागू नये म्हणूनच पवारांची पत्रकार परिषद; मनसेचे संदीप देशपांडे यांचा दावा

डॉक्टरला दिल्लीला नेल्यानंतर त्याने डॉक्टरवरही ‘हनिट्रँप’ करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली. मात्र, डॉक्टरने वेळीच सतर्कता दाखवल्यामुळे ते थोडक्यात वाचले. अन्यथा पारसेने छायाचित्राबाबत त्याला धमकी दिली असती. या प्रकरणी गुन्हे शाखेने कोतवाली पोलिसात तोतया अजित पारसेवर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होतातच पारसेने घरी पोलिसांनी छापा घातला. त्यावेळीसुद्धी अजितने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने हातात चाकू घेऊन स्वत:चा गळा कापण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, एका पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे अजितचा जीव वाचला होता. त्यानंतर काही महिलांशी त्याची अश्लील चॅटिंग उघडकीस आल्यानंतर त्याचा समाज माध्यम विश्लेषकाचा बुरखा फाटला होता. त्यामुळे त्याने रुग्णालयाच्या खिडकीतून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी एका परिचारिकेने सतर्कता दाखवल्यामुळे त्याचा जीव वाचला. तिसऱ्यांना अजितने सोमवारी दारूसाठी घरात तोडफोड केली. त्यानंतर त्याला सायंकाळी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, आज चौथ्यांदा अजितने व्यसनमुक्ती केंद्रातही आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच त्याला वर्धा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा >>>नागपूर: बंदिवानांच्या कलागुणांना प्रोत्साहन, तयार केल्याल्या आकर्षक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पारसे हा प्रसारमाध्यमांतून नेहमी चर्चेत राहत होता. त्याने विदेशात जाऊन अंगभर टॅटू काढले होते. त्याच्या श्रीमंतीला भाळून अनेक महिला, तरुणी स्वत:हून मैत्री करीत होत्या. मात्र, पैशाच्या लोभी अजितने काही धनाढ्य, व्यावसायिक महिलांशी खासगी मैत्री केली. त्यामध्ये धरमपेठ, आरपीटीएस रोड, रामदासपेठ परिसरातील काही धनाढ्य महिलांना जाळ्यात ओढले होते. त्यांची काही अश्लील चॅटिंग आणि छायाचित्रही अजितच्या मोबाईलमध्ये सापल्याची माहिती सूत्रांनी दिली.पारसेने काही संस्थासंचालक, डॉक्टर, व्यावसायिक आणि दिव्यांगांनाही कोट्यवधींचा निधी मिळवून देण्याच्या नावाखाली कोटींनी लुबाडले आहे. सध्या डॉ. मुरकुटे यांनी साडेचार कोटींची फसवणूक केल्याची तक्रार आहे. मात्र, याच्यासह काहींनी तक्रार देण्यासाठी पोलिसांशी संपर्क केला आहे. लवकरच स्वतंत्र गुन्हे दाखल होऊन अजित पारसेची संपत्ती जप्तीची पोलीस कारवाई करणारा आहेत.