नागपूर : जिल्हा न्यायालय नवनवीन घटनांसाठी तसे प्रसिद्धच आहे. कधी लिफ्टमध्ये लोक अडकणे तर कधी भर न्यायालयात हल्ला होणे हे प्रकार अनेकदा समोर आले आहेत. मात्र, सोमवारी सकाळी न्यायालयल सुरू होताच जिल्हा न्यायालयामध्ये गंभीर प्रकार घडला.

एका कनिष्ठ वकिलाने आपल्याच वरिष्ठ वकिलाच्या डोक्यावर खुर्ची उचलून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा न्यायालयातील वकील ॲड. उमरे यांना त्यांच्याच्या हाताखाली काम करणाऱ्या कनिष्ठ वकिलाने डोक्यावर खुर्चीने मारहाण केली. यामध्ये ॲड. उमरे जखमी झाले आहे. त्यांच्यावर तात्काळ न्यायालयामध्ये असलेल्या रुग्णालयातून उपचार करण्यात आले.

हेही वाचा – विरोध डावलून काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानी दिली होती संघ शिक्षा वर्गाला परवानगी!; संघाचे सरकार्यवाह होसबळेंचा मोठा दावा

हेही वाचा – उपराजधानीतील आठवडी बाजारातील दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त; आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ॲड. उमरे यांना मारहाण कुणी केली असे विचारले असता त्यांनी त्यांच्या कनिष्ठ वकिलाचे नाव घेतले. मारहाण कोणत्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. खुर्ची आणि टेबलकरिता हे भांडण झाल्याची चर्चा आहे.