नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर आरोप करण्यापेक्षा भाजपाच्या काळात ओबीसींची जनगणना, ओबीसी विद्यार्थ्यांचे वसतिगृह आणि ओबीसींची पदभरती या मुद्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. ओबीसी समाजाबदल आपुलकी असती तर ओबीसींच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम बावनकुळे यांनी व त्यांचे सरकारने केले असते, अशी टीका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

ओबीसीची जातीनिहाय जनगणना व्हावी ही मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. आरक्षणाच्या दुष्टीकोणातून ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना झाल्यास त्याचा फायदा हा समाजाला होईल. या गंभीर बाबीकडे चंद्रशेखर बावनकुळे व त्यांचे सरकार हे लक्ष का देत नाही ? १५ ऑगष्ट पूर्वी राज्यात एकूण ओबीसींसाठी ७२ वसतिगृह सुरु करण्याची घोषणा केली. परंतु अद्याप एकही वसतिगृह सुरु झाले नाही.

हेही वाचा >>>पती व सासूची गर्भवती महिलेला जबर मारहाण; नवजात बाळ दगावले

ओबीसींना घरकुल योजनाचा फायदा हा ओबीसी समाजाला होणार नाही. घरकुल बांधण्यासाठी जो निधी देण्यात येणार तो केवळ १ लाख २० हजार इतका आहे. ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्या एका अहवालानुसार घरकुल बांधण्यासाठी निधी नसल्याने राज्यातील जवळपास २ लाख ३६ हजार ३५० घरकुलाचे बांधकामे अपूर्ण आहेत.

हेही वाचा >>>विवाहित महिलेचा लग्नास नकार, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यात निवास व भोजनाच्या खर्चाची रक्कम जमा करणारी आधार योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्यापही याची पूर्तता करण्यात आली नाही. शरद पवार यांच्यावर आरोप करण्यापेक्षा ओबीसींचे प्रश्न सरकारच्या माध्यमातून मार्गी लावावे, असे देशमुख म्हणाले