चंद्रपूर : राज्यात बंदी असलेल्या सुगंधित तंबाखूची जिल्ह्यात तस्करी सुरू असून बल्लारपूर टोल नाक्यावर मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नागपूर व अमरावतीच्या दक्षता विभागच्या पथकाने १ कोटी ११ लाखांचा सुगंधी तंबाखू जप्त केला. या कारवाईनंतर बल्लारपूरचा गुटखा किंग ‘जयसुख’चे नाव चर्चेत आले आहे.

नागपूर व अमरावतीच्या अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली की कर्नाटकमधून सुगंधित तंबाखू ट्रकमधून तस्करी होत आहे. माहिती मिळताच दोन्ही दक्षता टीमने संयुक्त कारवाई करीत विसापूर टोल नाक्यावर खबरीने दिलेल्या माहितीनुसार दोन ट्रक पकडले. ट्रक चालकाला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ट्रकमध्ये पोहे असल्याचा दावा करीत होता. पण त्या ट्रकमध्ये सुगंधित तंबाखू असल्याने वरचा तरपाल उघडल्याने त्यात कोटी रुपयांचा माल मिळून आला. दोन बारा चक्का ट्रकला पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे आणून तपास केला तर पांढऱ्या पलास्टिकच्या शेकडो बोऱ्यात सागर नावाचा सुगंधित तंबाखू आढळून आला. तंबाखूची अंदाजित किंमत एक कोटी अकरा लाखांपेक्षा जास्त असू शकते, अशी माहिती नागपूरचे दक्षता विभागटे (विंजिलेन्स) अन्न व औषधी विभागचे अधिकारी यांनी दिली.

हेही वाचा – सावधान..! शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करताय? व्यावसायिकाची १० लाखांची फसवणूक

चंद्रपूर जिल्ह्यात अवैध तंबाखू तस्कर अवैध रीतीने कच्चा माल सुगंधित तंबाखूची तस्करी करून आपल्या कारखान्यात विषारी केमिकलचा उपयोग करून सुगंधित तंबाखू तयार करून त्याची पॅकिंग करून विविध नावाने संपूर्ण विदर्भात पुरवठा करतात. रोज कोटी रुपयांचा तंबाखू विक्रीसाठी तयार करण्यात येत आहे.

संबंधित अधिकारी यांना माहिती असूनही कारवाई होत नाही. नागपूर व अमरावतीची दक्षता विभागाची विजिलेंस टीमचे अन्न व औषधचे अधिकारी यांनी जिल्ह्यातील मोठी कारवाई करीत जिल्ह्यातील तंबाखू तस्कर यांना मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – कायदा केल्यानंरतही महिलांना आरक्षणाचा लगेच लाभ नाही! कारण काय? जाणून घ्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात सुगंधित तंबाखू गुजरात व कर्नाटक येथून मध्य प्रदेश येथील (TP) तयार करून विदर्भातील विविध ठिकाणी माल उतरवून त्यात केमिकलद्वारे स्प्रे करून तयार करतात व मोट्या प्रमाणात काही निवडक तंबाखू तस्कर दोन्ही जिल्ह्यांत पुरवठा करतात. संबंधित अधिकारी यांना गुंगारा देण्यासाठी ट्रक व छोटे मालवाहक गाड्यांमध्ये पोहे, मुरमुरे आलू चिप्सचे पॅकेट, असे विविध प्रकारचे प्रयोग करून तस्करी करीत असतात. जिल्ह्यातील ही मोठी कारवाई केल्याचे पोलिसांनी सांगितले.