scorecardresearch

Premium

अखेर कंत्राटी भरती रद्दचा शासन निर्णय जाहीर, सर्व कंपन्यांसोबतचे करार रद्द; पुढे अशी भरती होणार…

आता बाह्यस्रोत मनुष्यबळ पुरवणाऱ्या सर्व नऊ कंपनीसोबत करार रद्द होणार आहे.

state government cancel contract recruitment, department recruit own level
अखेर कंत्राटी भरती रद्दचा शासन निर्णय जाहीर, सर्व कंपन्यांसोबतचे करार रद्द; पुढे अशी भरती होणार… (छायाचित्र- लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नागपूर: राजकीय पक्ष, विविध विद्यार्थी संघटना आणि जनमताच्या रेट्यामुळे कंत्राटी नोकरभरती रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यानंतर अखेर दहा दिवसांनी शासन निर्णय काढून कंत्राटी भरती रद्द करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळे आता बाह्यस्रोत मनुष्यबळ पुरवणाऱ्या सर्व नऊ कंपनीसोबत करार रद्द होणार आहे. तसेच आता विभाग स्वतःच्या पातळीवर भरती करू शकणार आहे.

नोकरभरतीमुळे सरकारी तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण कमी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सल्लागार, वरिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापरीक्षक, जिल्हा समन्वय विधि अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, माहिती अधिकारी अशा विविध ७४ संवर्गातील पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने मार्चमध्ये घेतला होता.

startup company, tax relief, money mantra, finance,
Money Mantra : स्टार्टअप कंपन्यांना कसा मिळणार कर दिलासा?
hidden charges on loans
विश्लेषण : कर्जावरील छुप्या शुल्काला आता प्रतिबंध? काय आहे ‘केएफएस’? बँका, वित्तीय कंपन्यांसाठी ते बंधनकारक का?
indian share market
विश्लेषणः भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार कशा पद्धतीनं करतात गुंतवणूक? वाचा सविस्तर
Bharat Mobility Global Expo 2024
भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोला आजपासून सुरुवात; तुम्हाला प्रवेश कसा मिळेल? कोणत्या कंपन्या करणार कार लाँच? जाणून घ्या…

हेही वाचा… राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्यावर फाशी रद्द करण्यासाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव, काय आहे प्रकरण?

राज्य कामगार विभागाच्या १४ मार्च २०२३ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती. त्यासाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली. मात्र हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता मर्यादित न ठेवता सरकारने या निर्णयाची व्याप्ती थेट महापालिका, नगरपालिका, महामंडळांपर्यंत वाढवल्याने विद्यार्थी संघटना आणि राजकीय पक्षांनी याविरोधात आंदोलन उभारले होते.

हेही वाचा… नागपूर: मेंढ्या चारण्यावरून झालेल्या वादातून हत्या; आरोपीला जन्मठेप

कंत्राटी भरतीमुळे सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याने राज्यातील कंत्राटी भरतीचे पाप तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारचे असल्याचा आरोप करीत हा निर्णय रद्द करण्याची घोषणा फडणवीस यांनी २० ऑक्टोबरला केली. त्यानंतर शासनाने कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: As the state government has decided to cancel contract recruitment the department will now be able to recruit at its own level nagpur dag 87 dvr

First published on: 01-11-2023 at 17:14 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×