नागपूर : ॲग्रोव्हिजन प्रदर्शनीतील बीजारोपण, धान कापण्याची आधुनिक तंत्रे पाहून खूप प्रभावित झालो. आसाममधील पायाभुत सुविधांच्या अभावामुळे कृषीमध्ये आम्ही विकसित होऊ शकलो नाही. मात्र, गडकरींनी रस्त्यांच्या चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्याने आता चांगली प्रगती होत आहे. अरुणाचल प्रदेशात रस्त्यांचे जाळे तयार केल्याने नितीन गडकरी यांना ‘स्पायडर मॅन’ म्हणून संबोधले जाते. गडकरींनी रस्त्यांचे जाळे बनवीत आसामला विकासाच्या मार्गावर आणल्याचे कृषीमंत्री टागे टाकी म्हणाले.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानावरील ॲग्रो व्हिजन-२०२२ या कृषी प्रदर्शनाचा सोमवारी समारोप झाला. यावेळी मंचावर आसामचे कृषीमंत्री टागे टाकी, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, रवी बोरडकर, डॉ. विकास महात्मे, सुलेखा कुंभारे उपस्थित होते. गडकरी पुढे म्हणाले, भविष्याचा वेध घेऊन शेतकऱ्यांनी पुढे जायला हवे. त्यासाठीच ॲग्रो व्हिजन आहे. हा उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून सुरू असून येथे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचे बळ दिले जाते.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Love Jihad, pune, Pune University
‘लव्ह जिहाद’च्या आरोपावरून मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल; पुणे विद्यापीठाच्या आवारातील घटना
educational decision
‘या’ शैक्षणिक निर्णयामुळे निवडणुकीत फटका? पुण्यातील शिक्षण संस्थेने शिक्षण मंत्र्यांना पाठविलेल्या पत्राची चर्चा
navi mumbai, cctv camera, navi mumbai cctv camera
निम्म्या नवी मुंबई शहरावर सीसीटीव्हिंची नजर नाहीच

हेही वाचा: पुणे काँग्रेसची मरगळ कधी दूर होणार ?

हा उपक्रम आता समाजमाध्यमातून वर्षभर राबवला जाईल. सोबत ॲग्रो व्हिजनसाठी वर्धा मार्गावर साडेचार एकर जागा घेतली आहे. येथेही विविध वास्तू उभारली जाईल. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी बाजारही उपलब्ध करण्याची गरज आहे. त्यामुळे लवकरच सेंद्रिय शेतमालाचा बाजारही नागपुरात सुरू केला जाईल. ॲग्रो व्हिजनच्या माध्यमातून विदर्भातील शेतकऱ्यांची आत्महत्या शुन्य करण्यासाठी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासह त्यांना आधुनिक तंत्रज्ञानशी जोडण्याचा प्रयत्न आहे. त्यातून तरुणांना रोजगारासह शेतकऱ्यांना आर्थिक संपन्न करून कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमातून आता स्मार्ट शहराप्रमाणे स्मार्ट गावेही तयार करण्यात येतील. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनीही आपले मत मांडले. आभार रमेश मानकर यांनी मानले.