बुलढाणा: जमीन मोजणीत अन्याय झाल्याच्या कारणावरून शेतकऱ्याने अंगावर इंधन ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने अनर्थ टळला. खामगाव येथील भूमी अभिलेख कार्यालयात ही खळबळजनक घटना घडली असून यामुळे यंत्रणांची धावपळ उडाली.

हेही वाचा – तायवाडे म्हणतात ओबीसींवर अन्याय नाही, भुजबळांना समर्थनही नाही

हेही वाचा – वर्धा : कारंज्यातील मार्केटमध्ये आग, चार दुकाने खाक; अग्निशमन दलाचा पत्ताच नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्ञानेश्वर पांडुरंग लांडे (राहणार आवार तालुका खामगाव) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. खामगाव येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने पिंप्री गवळी येथील शेतजमिनीची मोजणी केली असता त्यात तफावत असल्याचा आरोप त्याने केला. त्यानंतर त्याने अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्मचारी व उपस्थित ग्रामस्थांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने संभाव्य अनर्थ टळला. यावेळी शेतकऱ्याने आकांत करून न्याय देण्याची मागणी केली. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले.