यवतमाळ : वणी विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच, सहा दिवसांपासून भाजप कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मात्र भाजप उमेदवार, भाजप जिल्हाध्यक्ष आणि ज्याच्यावर वक्तव्य केल्याचा आरोप आहे तो कार्यकर्ता यांनी असा कुठलाच प्रकार घडला नसल्याचे स्पष्ट करून, या प्रकरणावर पडदा टाकला आहे.

न घडलेल्या प्रकाराने वणीत भाजपची कोंडी झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र या प्रकारामागील बोलविता धनी वेगळाच असल्याची चर्चा आता वणीत सुरू आहे. वणी हा कुणबीबहुल मतदारसंघ आहे. येथे २०१४, २०१९ मध्ये भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार हे विजयी झाले होते. आपल्या समाजाची अत्यल्प मते असुनही कुणबी समाजाने साथ दिल्यानेच आपण वणी मतदारसंघात जिंकू शकलो, असे बोदकुरवार यांनी या प्रकारानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आपल्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर दोन कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद व धक्काबुक्की झाली होती. मात्र यावेळी भाजपच्या कार्यकर्त्याने कुणबी समाजाबद्दल कोणतेही आक्षेपार्ह वक्तवय् केले नाही. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दोन्ही कार्यकर्त्यांची समजूत घालून हा वादावर पडदा पाडला होता. मात्र न घडलेल्या घटनेला समाजमाध्यमांत पसरवून कुणबी समाजाच्या मतांचे विभाजन व्हावे यासाठी आपल्याविरोधात राजकीय षडयंत्र रजले जात असल्याचा आरोप संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केला.

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Manoj Jarange Patil maulana sajjad nomani
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे आता दिल्ली हादरवणार? मुस्लीम, बौद्ध धर्मगुरुंची साथ? रणनिती तयार, हिंदीचा अडथळाही दूर
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हे ही वाचा… वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…

हे ही वाचा… ‘भाजपने महाराष्ट्र लुटण्यासाठीच मविआ सरकार पाडले’, उद्धव ठाकरेंचा आरोप

कुणबी समाजाच्या दबावनंतर या प्रकरणात भाजप कार्यकर्ता सुधीर साळी याच्या विरोधात वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेत सुधीर साळी याला मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. मात्र साळी याने याबाबत कोणाविरूद्धही तक्रार दाखल केली नाही. एक पत्रक प्रसिद्ध करून त्याने कार्यक्रमाच्या आयोजनावरून आपला व एका कार्यकर्त्याचा शाब्दिक वाद झाला होता. मात्र आपण कुणबी समाजाविरोधात कुठलेच आक्षेपार्ह वक्तव्य केले नाही, असे म्हटले आहे. सहचारिणी कुणबी समाजाची असताना आपण या समाजाविरूद्ध आक्षेपार्ह कसे बोलू शकतो, असा प्रतिप्रश्न साळी याने केला आहे. एक उमेदवार व त्याचे कार्यकर्ते राजकीय स्वार्थ साधण्यासाठी एका पत्रकाराच्या आडून आपला राजकीय बळी देत असल्याचा आरोप साळी याने पत्रकातून केला आहे. स्थानिक पोर्टलच्या या वृत्तप्रतिनिधीच्या विरोधात विविध गुन्हे दाखल आहेत. घटनेचा कोणताही पुरावा नसताना या प्रकरणात आपली जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या सर्वांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुधीर साळी याने पत्रकातून दिला आहे.

Story img Loader