नागपूर : भाजपला नेते घडवता आलेले नाहीत. हा पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील नेत्यांच्या भरवशावर चालत आहे. भाजपा म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी आहे, अशी प्रखर टीका शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा- पर्व २ ची सुरुवात नागपुरात आज झाली. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार प्रहार केला.

व्यासपीठावर सतीश हरडे, नितीन तिवारी, दीपक कापसे, दुष्यंत चतुर्वेदी, किशोर कुमेरिया, सुरेश साखरे, शिल्पा बोडखे, प्रमोद मानमोडे, बाळा राऊत, मंगला गवरे, विशाल बरबटे, अपूर्वा चित्तलवार उपस्थित होते. अंधारे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवले आहे. त्यांनी इतर पक्षांना फोडून, सरकार पाडून महाराष्ट्र अस्थिर केला आहे. त्यामुळे येथे गुंतवणुकीचा ओघ कमी झाला. पण, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डावपेचाचा भाग म्हणून फडणवीस यांना हुशार, मास्टरमाईंड, चाणक्य ठरण्याचा प्रयत्न सुरू आहे.

हेही वाचा >>> बनावट जात पडताळणी करून विमुक्त जमातीमध्ये घुसखोरी; आता निघणार ‘ही’ पदयात्रा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जर ते चाणक्य आहेत तर त्यांनी आजवर कोणता नेता घडवला? ते केवळ तपासयंत्रणांचा धाक दाखवून दहशत निर्माण करीत आहेत. त्यांना कोणी प्रश्न विचारू नये, असे त्यांना वाटते. ॲड. सतीश उके यांनी फडणवीस यांना निवडणुकीत खोटी माहिती दिल्याबद्दल विचारले म्हणून त्यांच्यावर ईडीकडून कारवाई करण्यात आली. पकंजा मुंडे यांनी थोडी वेगळी भूमिका मांडली, तर त्यांच्या साखर कारखान्याला कारवाईची धमकी दिली गेली. फडणवीस २०२४ मध्ये मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. हाच संदेश पोहचवण्यासाठी ही महाप्रबोधन यात्रा आहे, असेही अंधारे म्हणाल्या.