नागपूर : विधिमंडळाच्या सभागृहात मोबाईलवर ‘जंगली रमी’ खेळण्याचा आरोप असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा अजित पवार यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजपचे सावनेरचे आमदार आशीष देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.विधिमंडळाच्या सभागृहात ‘जंगली रमी ’ खेळताना महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रोहित पवार यांनी हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर कोकाटे यांच्यावर तीव्र टीका होत आहे.

विरोधी पक्षांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली असताना आता खुद्द सत्ताधारी भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनीही अजित पवार यांनी कोकाटेंवर कारवाईची मागणी करून राजकीय वर्तुळात खबळ उडवून दिली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे  जंगली रमी खेळतानाचा त्यांचा व्हीडीओ व्हायरल झाल्याने त्यावर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, कृषीमंत्र्यांनी या मुद्यावर त्यांचे स्पष्टीकरण दिले आहे. यापूर्वीही त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केले  आहे. आता जंगली रमीचा मुद्दा असेल. आता आता खुप झाले, अजित पवार यांची ओळख ‘ॲक्शन मॅन’ अशी आहे, त्यांनीच  त्यांच्यावर कारवाई करावी.देशमुख म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात ऑनलाईन गेमच्या आहरी  जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारच दिवसांपूर्वी ऑनलाईन गेमवर बंदी आणण्याबाबत भूमिका घेतली आहे.ऐवढेच नव्हे तर याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या सेलिब्रेटींवरही कारवाई करण्याचा मनोदय त्यांनी बोलून दाखवला आहे.  या पार्श्वभूमीवर खुद्द कृषीमंत्री माणिकराव कोकाटे जंगली रमी खेळत असेल तर त्यातून चुकीचा संदेश जातो. अजित पवार शेतकऱ्यांसाठी चागले काम करीत आहे,अशी भावना असताना महाराष्ट्राचा कृषीमंत्री जंगली रमी खेळत असेल तर ते त्यांच्या पदाला साजेसे नाही. त्यामुळे  आता अजित पवार यांनीच कृषीमंत्र्यांवरच बंदी घालावी, असे आमदार देशमुख म्हणाले, बंदी म्हणजे राजीनाम्याची मागणी का असा सवाल देशमुख  यांना केला असता अजित पवार यांनीच याबाबत अंतिम निर्णय घ्यावा. राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना राज्याच्या  कृषीमंत्र्यांच्या जंगली रमी खेळण्यामुळे स्वाभाविकपणे विरोधी पक्षासह  सर्वच स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे अजित पवार यांनी यासंदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा,असे देशमुख म्हणाले.