नागपूर : काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे खोट्या आश्वासनाचा दस्तऐवज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विरोध करणारा हा पक्ष देशात आता कमकुवत होत आहे. त्यामुळे पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत सोनिया गांधी आणि राहुल गांधी दोघेच काँग्रेसमध्ये राहतील, अशी टीका भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी आणि राज्यसभा खासदार दिनेश शर्मा यांनी केली.

भाजपाच्या स्थापना दिनानिमित्त दिनेश शर्मा नागपुरात आले असता ते प्रत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेसने पुन्हा खोटे आश्वासन देत जाहीरनामा जनतेसमोर ठेवला आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेसने खोटी आश्वासने दिली मात्र अजूनही तेथील लोकांना लाभ मिळाला नाही. काँग्रेसवर अन्य पक्षाचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे इंडिया आघाडी एकत्र येऊ शकत नाही.

हेही वाचा…‘मातोश्री’ विरुद्ध ‘वर्षा’ लढत ! खुद्दार विरुद्ध गद्दार असे स्वरूप देण्याचे ठाकरेंचे डावपेच

राहुल गांधी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकत नाहीत. देशात परिवारवाद आणि राष्ट्रवाद अशी लढाई आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात ४०० च्या वर जागेचे लक्ष्य केंद्रीत केले आहे आणि ते पूर्ण करु, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला. भाजप संविधान बदलणार अशी वक्तव्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून केली जातात मात्र या देशात संविधान बदलण्याची ताकद कोणाची नाही. काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपसह अन्य पक्षात प्रवेश करत आहेत. भाजपने संविधानाचा सन्मान केला असून ते कधीच बदलले जाणार नाही, असेही शर्मा म्हणाले.

हेही वाचा…वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली दिली आहे. ते हिंदू आणि सनातन विरोधी इंडिया आघाडीत जाऊन बसले आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला एका- एका ठिकाणी संघर्ष करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे गटाचा तर एकही खासदार निवडून येणार नाही, असेही शर्मा म्हणाले.