वर्धा : शालेय जीवनात विविध उपक्रमाचे आयोजन केल्या जात असते. विध्यार्थ्यांच्या उपजत हुशारीस व कला गुणांना वाव मिळावा असा त्यामागे हेतू असल्याचे म्हटल्या जाते. शिष्यवृत्ती परीक्षा ही त्यापैकीच एक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही संस्था पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीसाठी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठव्या इयत्तेसाठी घेत असते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी राज्यातील सर्व जिल्ह्यात होते.या परीक्षेसाठी शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदन अर्ज भरण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ७ डिसेंबर ही मुदत देण्यात आली होती. मात्र आता १५ डिसेंबर ही द्वितीय व अंतिम मुदतवाढ वाढवून देण्यात आली आहे.

आता नियमित शुल्कसह १५ डिसेंबर असून विलंब शुल्कसह २३ डिसेंबर राहील. अतिविलंब शुल्का साठी २४ ते २७ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या खेरीज अति विशेष विलंब शुल्कासह २८ ते ३१ डिसेंबर ही मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदन पत्र भरता येणार नाही, याची सर्वांनी गांभीर्यानी नोंद घेण्याचे सूचित आहे. राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी हा निर्णय कळविला आहे.

हेही वाचा…‘डिजीटल अरेस्ट’ हे भविष्यातील सर्वात मोठे संकट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासोबतच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होते. आठव्या वर्गासाठी ही परीक्षा २२ डिसेंबर रोजी होत आहे.ही परीक्षा महाराष्ट्रातील ७४४ केंद्रावर घेतल्या जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून १३ हजार ४५७ शाळांची व २ लाख ४८ हजार ३१२ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. परीक्षेची प्रवेशपत्रे शाळा लॉगिंग वर उपलब्ध करून देण्यात आली आहे.मात्र ही प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शाळा मुख्याध्यापकांची राहील.या प्रवेशपत्रात विद्यार्थी नाव, वडील नाव, आडनाव, आईचे नाव यातील स्पेलिंग दुरुस्ती तसेच जन्मतारीख, जात, आधारकार्ड व अन्य दुरुस्ती साठी २१ डिसेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगिंग मध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे.ऑनलाईन खेरीज कोणत्याही दुरुस्ती अर्जाचा विचार केल्या जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. नाव व अन्य दुरुस्त्या परीक्षा झाल्यानंतर होणार आहे. टपाल, समक्ष, ई मेल या स्वरूपातील तसेच मुदतीनंतर आलेल्या दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत पूर्ण नावात बदल केल्या जाणार नसल्याचेही सूचित आहे. शालेय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ही खबरदारी घेण्याची सूचना आहे.