अकोला : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने प्रवासी सेवेतून तिजोरीत भरीव महसूल प्राप्त केला आहे. खानपान सेवेतून ६.९ कोटींचे उत्पन्न प्राप्त केले. २०२३-२४ च्या तुलनेत खानपानातून प्राप्त महसुलामध्ये ७.४७ टक्क्यांनी वाढ नोंदवल्या गेली. ५.४६ कोटी रुपयांचा गैर-भाडे महसूल नोंदवला आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षात आतापर्यंत ६.९ कोटी रुपयांचा महसूल खानपान सेवेतून मिळवला. नोव्हेंबर २०२४ पर्यंत मागील विक्रमापेक्षा ३.९६ टक्के अधिक उत्पन्नाची नोंद झाली. विविध स्थानकांवर पुरवलेल्या अतिरिक्त सुविधांमुळे भुसावळ विभागाच्या खानपान सेवा उत्पन्नात वाढ शक्य झाल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाच्या कामामुळे लक्षणीय बदल झाले आहेत. नव्या प्रकारचे खानपान दालने प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुलभ व सुखद अनुभव प्राप्त होईल. खानपानच्या दालनांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. रेल्वे सेवांच्या आधुनिकीकरण आणि सुधारणेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

दरम्यान, रेल्वेच्या भुसावळ मंडळाने १५ डिसेंबरपर्यंत ५.४६ कोटी रुपयांचा गैर-भाडे महसूल मिळवला. मागील वर्षाच्या तुलनेत १६.५१ टक्के अधिक वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या लक्ष्याच्या १.९२ टक्के अधिक महसूल आतापर्यंत प्राप्त झाला आहे. मंडळाच्या महसूल स्रोतांना विविधता प्राप्त झाली. १४६ करार करण्यात आले असून त्याचे मूल्य ४० कोटी रुपये आहे. भुसावळ मंडळाच्या सहा स्थानकांवर बॅटरी कार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वरिष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांच्या गरजांची पूर्तता करण्यासोबतच वार्षिक २२ लाखाचा महसूल रेल्वेने प्राप्त केला. मंडळातील सात ठिकाणी विश्राम कक्ष सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यातून २६ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त होत आहे. सुरक्षितता आणि महसूल वाढवण्यावर लक्ष केंद्रित करणारी अनोखी योजना ‘पार्सल स्कॅनर’च्या माध्यमातून नाशिक रोड स्थानकावर राबवली जात आहे. त्यातून वार्षिक महसूल २.३५ लाख रुपये प्राप्त झाले.

हेही वाचा : आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…

भुसावळ मंडळाने आगामी प्रकल्पांसाठी निविदा जारी केल्या आहेत, ज्यातून १.४८ कोटी रुपये अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे. प्रवाशांच्या सोयीसुविधा आणि समाधानाला प्राधान्य देत, राजस्व निर्मितीसाठी नव्या वाटा शोधण्याचे हे सातत्य कायम राखले जाणार असल्याचे रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : “आज जितक्या संघटना मंत्र्यांचा सत्कार करताहेत त्या माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या असत्या तर…”, भाजप नेत्याच्या मनातले अखेर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ऑनबोर्ड’ विक्रीची योजना

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाकडून नाशिक रोड स्थानकावरील महिलांच्या प्रतीक्षालयाचे कंत्राट दिले जाणार आहे. भुसावळ यार्डमध्ये ‘बॉक्सएन वॅगन’ स्वच्छता, शेगाव आणि धुळे येथे रेल्वे ‘कोच रेस्टॉरंट’ची उभारणी, भुसावळ-नाशिक मार्गावर विविध वस्तूंच्या ‘ऑनबोर्ड’ विक्रीची योजना राबवली जाणार आहे.