scorecardresearch

“उद्धव ठाकरेंना बंडाची कल्पना होती, त्यांनी महिनाभरापूर्वीच शिंदेंना बोलावून घेतले आणि…”, चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लालसा होती. त्यासाठी ते कोणत्याही क्षणी बंड करणार, हे उध्दव ठाकरे यांना ठावूक होते – चंद्रकांत खैरें

Chandrakant Khaire, Uddhav Thackeray, Eknath Shinde, rebel
"उद्धव ठाकरेंना बंडाची कल्पना होती, त्यांनी महिनाभरापूर्वीच शिंदेंना बोलावून घेतले आणि…", चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट ( Image – लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

गडचिरोली : एकनाथ शिंदे बंडखोरी करणार आहेत. याबद्दल पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना माहिती होती. म्हणूनच बंडखोरीच्या महिन्याभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्री व्हायचे आहे काय, अशी विचारणा केली होती. असा गौप्यस्फोट शिवसेनेचे(ठाकरे) नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

हेही वाचा… Maharashtra News Live : राज्यपालांचं लांबलचक भाषण सुरू असताना भाजपा नेते आशिष शेलार झोपले होते – अमोल मिटकरी; वाचा प्रत्येक अपडेट एका क्लिकवर…

हेही वाचा… महिला पोलिसाची हत्या करून रेल्वेने पळून जाणाऱ्या दोघांना नागपुरात अटक

गडचिरोली येथे शिवगर्जना अभियानानिमित्त ते आले होते. यावेळी पत्रपरिषदेत माहिती देताना ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लालसा होती. त्यासाठी ते कोणत्याही क्षणी बंड करणार, हे उध्दव ठाकरे यांना ठावूक होते. म्हणूनच सत्तापरिवर्तनाच्या महिनाभरापूर्वी उध्दव ठाकरे यांनी शिंदेंना बोलावून घेतले व तुला मुख्यमंत्रीपद हवे काय अशी विचारणा केली. मात्र, त्यावेळेस त्यांनी नाही असे उत्तर दिले होते. परंतु काही दिवसांनी बंडखोरी केली. ‘खोके’ आणि सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली, असे खैरे म्हणाले. यामागे देवेंद्र फडणवीस यांचा हात असून शिवसेना पक्ष संपवण्यासाठी हे षडयंत्र रचले गेले. असा आरोपही खैरे यांनी केला.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 15:58 IST