नागपूर : एमआयएम ही भाजपाचीच ‘बी टीम आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना लाचार नाही, त्यामुळे ओवैसींना भेटण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांनी थोडं सांभाळून बोलावे, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना दिले. ते आज रविवारी शिवगर्जना संपर्क यात्रेसाठी नागपुरात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खैरे म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या बाजूने सर्वधर्मीय जनता आहे. सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांचा विजय होऊ दे, अशी प्रार्थना टेकडी गणेश मंदिरात करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा कौल आम्हाला मिळाल्यानंतर या आमदारांचे काय हाल होणार, हे वेळच त्यांना दाखवेल. आता आम्ही थांबणार नाही. शिवगर्जना करीत भविष्यात जनमत मिळवणार आहोत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर ओवैसींचा संदर्भ देत केलेल्या टीकेकडे खैरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, त्यांना नीट बोलता येत नाही. आम्ही ओवैसींकडे जायाला लाचार नाही. एमआयएम ही भाजपाची दुसरी फळी (बी टीम) आहे. त्यामुळे बावनकुळे यांनी थोडं सांभाळून बोलावे.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

हेही वाचा – आता दुरान्तोमध्ये तिकीट भाड्यात ‘बेडरोल’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या मुस्लीम समाज आमच्याकडे वळायला लागला. तसेच वंचित आमच्याकडे वळत आहेत. त्यामुळे भाजपाचा जळफळाट होत आहे. त्यांच्यात भांडणे कशी लावायची, हा प्रयत्न भाजप करीत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुडबुद्धीचे राजकारण करतात. सरकारमध्ये विरोधकांची कामे केली जात नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना बाजुला सारल्या जात आहे, अशा अफवा त्यांच्याच गटातून येतात. गडकरी यांनी मला एक वाक्य सांगितले होते, परंतु, ते आता यावेळी मी त्याबाबत बोलणार नाही. गडकरी यांना असं बाजुला सारणे योग्य नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले.