चंद्रपूर: संपूर्ण राज्यच नाही तर देशात खळबळ उडवून देणाऱ्या बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी चंद्रपूरचे सुपूत्र , सेवानिवृत्त न्यायाधीश , माजी लोकायुक्त मदनलाल टहलियानी करणार आहेत.

चंद्रपूर भूषण असलेले सेवानिवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी यांना संपूर्ण देश ओळखतो. त्यांनीच २६/११ मुंबई बॉम्बस्फोटातील कुख्यात आतंकवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश मदनलाल टहलियानी हे मूल येथील रहिवासी आहेत.   याच गावातून न्या. टहलियानी यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. या गावात आजही त्यांचे भाऊ, नातेवाईक वास्तव्याला आहेत.

हेही वाचा >>>दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनो सावधान!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही विद्यार्थी जीवन याच शहरात गेले. मुख्यमंत्र्यांच्या काकू व माजी राज्यमंत्री शोभा फडणवीस यांचे मूल हे कार्यक्षेत्र हे विशेष. निवृत्त न्यायाधीश टहलियानी यांनी गोंदिया येथून एलएलबी झाल्यानंतर प्रारंभी चंद्रपूर येथील ज्येष्ठ विधी अभ्यासक तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते अॅड. दादा देशकर यांच्या मार्गदर्शनात वकिली सुरू केली होती. १९७९ च्या सुमारास गडचिरोली, सिरोंचा, देसाईगंज व वरोरा येथे सरकारी वकील म्हणून कार्यरत होते. त्यानंतर न्यायाधीश व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पर्यंतचा प्रवास टहलियानी यांनी केला. .२६/११ घ्या मुंबई हल्ल्याचा खाल्यामुळे  न्या. टहलियानी यांची ओळख संपूर्ण देशाला झाली. विशेष म्हणजे त्यानंतर २०१५ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांची राज्याच्या लोकायुक्तपदी टहलियानी यांची नियुक्त केली होती. या पदावरूनही त्यांनी निष्पक्ष न्याय दिल्याच्या अनेक आठवणी आहेत हेच टहलियानी मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाची न्यायालयीन चौकशी करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५ मध्ये चंद्रपूरचे एक मुख्याध्यापक अचानक बेपत्ता झाले. त्यांच्या पत्नीने तत्कालीन सीईओंकडे आर्थिक मोबदला व निवृत्ती वेतनाचा दावा दाखल केला. मात्र ‘या प्रकरणात भारतात कुठेही न्याय मिळणार नाही’ असे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याने ती हादरली. अखेर सर्व कागदपत्रे घेऊन मूल येथे न्यायाधीश बंधूंच्या घरी गेली. ती कागदपत्रे पोस्टाने केवळ ५० रुपयांत लोकायुक्तांकडे पाठवली. अखेर २० दिवसांतच निकाल दिला. मुख्याध्यापकांच्या पत्नीला १३ लाखांचा मोबदला मिळाला.