चंद्रपूर : जिल्हा परिषदेला २०२१-२२ वर्षातील योजनांसाठी १४५ कोटी २४ लाख २३ हजारांचा निधी मिळाला असताना आतापर्यंत ८१ कोटी ४८ लाख ८५ हजारांचा म्हणजेच ४३.७२ टक्केच निधी खर्च झाला. मार्च एन्डिंगला आता अवघे दोन आठवडे शिल्लक असल्याने उर्वरित ६३ कोटी ७५ लाख ३८ हजार रुपयांचा निधी कसा खर्च करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हा निधी वेळेत खर्च न झाल्यास शासनास परत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेष म्हणजे, शासकीय कर्मचारी संपात सहभागी झाल्याने शिल्लक निधी खर्च होण्याची कोणतीही शक्यता नाही.

हेही वाचा >>> बुलढाणा : फासेपारधी बांधवांचे जिल्हा कचेरी समोर धरणे आंदोलन सुरू

जिल्हा परिषदेला वार्षिक योजनेंतर्गत २०२१-२२ वर्षात कृषी, पशुसंवर्धन, सिंचन, समाजकल्याण, आरोग्य, बालकल्याण, शिक्षण (प्राथ). बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा व पंचायत अशा १० विभागांसाठी कोट्यवधींचा निधी मिळाला होता. योजनांवर खर्च झाल्यानंतरही १४५ कोटी २४ लाख २३ हजारांचा निधी शिल्लक राहिला. हा निधी २०२२-२३ या वर्षात खर्च करणे अपेक्षित होते. मात्र, १३ मार्च २०२३ च्या नोंदीनुसार, ८१ कोटी ४८ लाख ८५ हजारांचाच निधी म्हणजेच ४३.७२ टक्के निधी खर्च झाला. उर्वरित ६३ कोटी ७५ लाख ३८ हजार रुपयांचा निधी शिल्लक आहे. सदरचा निधी ३१ मार्च २०२३ पर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे.

हेही वाचा >>> जुन्या पेन्शनच्या मागणीला सहाशे न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा पाठिंबा; काळ्या फिती लावून काम

मात्र, अवघ्या १५ दिवसांत हा निधी खर्च कसा होईल असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. निधी खर्च न झाल्यास राज्य शासनाकडे परत जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निधी परत गेल्यास अनेक कामे ठप्प होवून कामे खोळंबल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जान्सन यांच्याशी संपर्क साधला असता, मार्च अखेरपर्यंत शिल्लक निधी खर्च करण्यासाठी रूपरेषा तयार करण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्च करण्यात येईल असे ते म्हणाले.

कोट्यवधींचा निधी परत जाणार

कृषी व पशुसंवर्धन विभागाकडे २०२१-२२ चा अखर्चित निधी अनुक्रमे १०७९. ७८ कोटी, ३५७. २४ कोटींचा निधी शिल्लक होता. योजनांवर खर्च करण्यात हे दोन विभाग तुलनेने मागे आहेत. कृषी विभागाने २६.७४ टक्के तर पशुसंवर्धन विभागाने २६.३४ टक्के निधी खर्च केल्याची आकडेवारी सांगते. दुर्लक्ष झाल्यास जि. प.चा ६३ कोटी ७५ लाख ३८ हजारांचा निधी परत जाऊ शकतो.

कृषी, आरोग्य, बालकल्याण व बांधकाम विभाग खर्चात माघारला

कृषी, आरोग्य, बालकल्याण व बांधकाम विभागाकडे २०२१-२२ चा निधी सर्वाधिक अखर्चित आहे. पंचायत विभागाकडेही ४१३७. २४ कोटींचा निधी शिल्लक होता. पंचायतने हा निधी योजनांवर खर्च केल्याने खर्चाची टक्केवारी ५६.६२ टक्क्यांपर्यंत पोहोचली. बांधकाम विभाग ३५. ३२ टक्क्यांवर थांबला आहे. सिंचन विभागाने ८९. ५४ टक्के तर समाजकल्याण विभागाने ८०.३४ टक्के मागील वर्षातील अखर्चित निधी खर्च केला. आरोग्य विभागाकडे २४७०.५५ कोटींचा निधी शिल्लक होता. त्यातील ११०६.७१ कोटींचा निधी खर्च झाला. खर्चाची टक्केवारी ४१.२३ एवढी आहे.

चालू वर्षाचे ८१ कोटींपैकी १७ कोटी खर्च

२०२२-२३ वर्षासाठी जि. प.ला ८१ कोटी ५८ लाख २८ हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी आतापर्यंत १७ कोटी ४७ लाख ३९ हजारांचा निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी २०२४ पर्यंत खर्च करता येतो.

कोणत्या विभागात किती निधी खर्च  (कोटीत)

कृषी                     १०७९.७८- २६.७४ टक्के

पशुसंवर्धन           ३५७.२४-  २६.३४

सिंचन                  २५३.९०- ८९.५४

समाजकल्याण     ८२.२८- ८०.३४

आरोग्य               ११०६.७१- ४१. २३

बालकल्याण        १६३८.४९- ५१.९६

शिक्षण प्रा.           ७४७.६९-५१.६९

बांधकाम              १२९४.१२- ३५.३२

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाणीपुरवठा         ००-००