नागपूर : भारतीय जनता पक्षाने नेहमीच छोट्या पक्षांचा सन्मान केला आहे. जे लहान पक्षातील लोक आमच्या पक्षात येण्यासाठी तयार आहे. त्यांना आम्ही घेणार आहे. मी प्रत्येक बुथवर ५०- ५० कार्यकर्त्याचे पक्षप्रवेश करा, असे आवाहन केले. पक्ष संपवा असे बोललो नाही. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते.

प्रत्येक बुथवर प्रत्येक मतदान केंद्रावर विविधपक्षाचे कार्यकर्ते मोदींना साथ देण्यासाठी भाजपमध्ये यायला तयार आहे. त्यांना सोबत घ्या. बाहेरचे लोक आल्यामुळे तुमच्या पदाला कुठलाही धक्का लागणार नाही असे कार्यकर्त्यांना सांगितले आहे असे बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा…गावा-गावातील छोटे पक्ष संपवा! चंद्रशेखर बावनकुळे यांचे भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत असूनही सर्व घटक पक्षांना पक्षांमध्ये त्यांनी सामावून घेतले आहे. गेल्या २०१४ व २०१९ मध्ये छोट्या पक्षांना सामावून घेत मोठे स्थान दिले. महादेव जानकर मंत्री झाले. त्यामुळे भारतीय जनता पक्ष हा छोट्या पक्षांना सांभाळणारा पक्ष आहे. या पक्षामध्ये छोट्या पक्षांना सन्मान आहे. भारतीय जनता पक्षाची उंची वाढवणे ही माझी जबाबदारी आहे. मोदीजींच्या गॅरंटीला मान्य करतील त्यांनी सर्वांनी पक्षात यावे असेही बावनकुळे म्हणाले. भारतीय जनता पार्टीने इतिहासात लहान पक्षांना मोठे स्थान दिले आहे. असेही असेही बावनकुळे म्हणाले.