नागपूर : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप काही करेल आणि आम्ही गप्प बसून बघत राहू, असे होणार नाही. पहाटेच्या  शपथविधीनंतर त्यांचा बंदोबस्त के ला होता. त्याप्रमाणे पुन्हा असे काही घडल्यास ‘करेक्ट कार्यक्रम’  के ला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

भुजबळ विदर्भाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले असता सोमवारी प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. फडणवीस यांनी सरकार के व्हा पडेल, हे कुणाला कळणार नाही, असे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी नागपुरात के ले होते. त्यावर भुजबळ म्हणाले, ते काय करतात, हे आम्हाला माहिती पडते. आम्हाला काही कळत नाही, या भ्रमात त्यांनी राहू नये.

जोपर्यंत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे एकत्र आहेत, तोपर्यंत हे सरकार पडणार नाही. आता आम्ही घट्ट पाय रोवून आहोत, असे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात के ले. यातून विरोधकांनी काय ते समजून घ्यावे, असेही भुजबळ म्हणाले.

ओबीसींसाठी शिवसेना सोडली

ओबीसींच्या मुद्यांवरून आपण शिवसेना सोडली. त्यावेळी नागपुरात सुमारे आठ दिवस होतो.  के ंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापराबाबत भुजबळ म्हणाले,  राज्यात कुणाला काम करू द्यायचे नाही, अगदी नामोहरम करून सोडायचे, या भावनेतून सध्या राजकारण के ले जात आहे. भाजपला याचे परिणाम भोगावे लागतील.

धान्य घोटाळ्याची चौकशी

सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्य व्यापाऱ्यांना विकले जात असल्याची तक्रार आहे. यासंदर्भात महानिरीक्षक स्तरावर चौकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्याकडे के ली आहे. धान्य तस्करीत गुंतलेल्या नागपुरातील मुख्य पुरवठादाराचीही चौकशी करण्यात येईल.